Download App

भाजपच सर्वात मोठा पक्ष, पण कोणाला आपला पक्ष मोठा वाटत….; CM फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला

कोणाला आपला पक्ष मोठा वाटत असेल तर त्यामध्ये मला काही हरकत घेण्याचं कारण नाही, असं म्हणत फडणवीसांनी राज ठाकरेंनी टोला लगावला.

  • Written By: Last Updated:

Devendra Fadnavis : आगामी महापालिका निवडणुकीच्या (Municipal elections) पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मुंबईत पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत बोलताना त्यांनी एक महत्त्वाचे विधान केलंय. मुंबईत मनसे आणि शिवसेना (ठाकरे) वगळता दुसऱ्या पक्षांची जास्त ताकद नाही, असं ते म्हणाले. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘आरपार’ चित्रपटातील ललित-ऋताचं रोमँटिक गाणं प्रदर्शित, गाण्याचे सुंदर बोल प्रेक्षकांच्याही पसंतीस 

कोणाला आपला पक्ष मोठा वाटत असेल तर त्यामध्ये मला काही हरकत घेण्याचं कारण नाही, असं म्हणत फडणवीसांनी राज ठाकरेंनी टोला लगावला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. राज ठाकरेंच्या वक्तव्याविषयी विचारले असता ते म्हणाले की, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष मुंबईत सर्वात मोठा पक्ष होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही मुंबईत सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष होता. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतही भारतीय जनता पक्ष मुंबईत सर्वात मोठा पक्ष आहे. पण जर कोणाला आपला पक्ष मोठा वाटत असेल तर मला त्यामध्ये काहीही हरकत घेण्याचं कारण नाही. प्रत्येकाला आपल्या पक्षाला मोठं म्हणण्याचा अधिकार आहे, असं म्हणत फडणवीस यांनी कोणाचेही नाव न खोचक टीका केली.

अरमान मलिक दोन नाही तर चार महिलांचा पती; न्यायालयाने पाठवले समन्स 

राहुल गांधी यांनी मतदार यादी घोळाचा आरोप करत केंद्रीय निवडणूक आयोग आणि सत्ताधारी भाजपला लक्ष्य केलं. यावरही फडणवीस यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, मतदार याद्यांमधील चुका सुधारण्यासाठी पुनपरिक्षण गरजेच आहे, असं ते म्हणाले. तसेच गेल्या २५ वर्षांत याद्यांमध्ये सुधारणा न झाल्यामुळे दोष निर्माण झाले आहेत. या चुका सुधारण्यासाठी मतदार याद्यांचे पुनरीक्षण करणे आवश्यक आहे. व्यापक पुनरीक्षण हाच यावरील उपाय आहे. निवडणूक आयोगाने आता हे काम सुरू केले आहे, परंतु काही लोक त्याला विरोध करत आहेत, हे चुकीचं आहे, अशी भूमिका फडणवीसांनी मांडली.

follow us