Maharashtra Politics : ‘महाविकास आघाडीची ताकद कसबा निवडणुकीत दिसली तशीच आता आगामी निवडणुका आणि आंदोलनात दिसेल. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारला इतर निवडणुका घेता येणार नाहीत. मंत्रिमंडळाचा विस्तार करता येणार नाही. आमदारांची यादीही मंजूर करून घेता येणार नाही. सध्या राज्य सरकारचा जो कारभार चालला आहे तो दुर्दैवी आहे’, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan)यांनी सरकारवर टीका केली. राज्यासमोर आज अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. सरकारला हे प्रश्न सोडविण्यात पुरते अपयश आले आहे, असा आरोपही त्यांनी केला.
साईंची आरती करून बागेश्वर बाबाचा निषेध करणार, आव्हाड संतापले
चव्हाण मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘महाविकास आघाडी म्हणून आम्ही अतिशय मजबूत आहोत.’ कर्नाटक राज्य सरकारकडून सीमावर्ती भागात महात्मा फुले जनआरोग्य योजना राबविण्यात अडचणी निर्माण केल्या जात आहेत. तेथील मुख्यमंत्री विरोध करत आहेत. या मुद्द्यावर चव्हाण म्हणाले, ‘हा त्या सरकारचा प्रश्न आहे. मात्र, कर्नाटकडून जर सीमावर्ती भागातील नागरिकांवर अन्याय केला जात असेल तर जनता आजिबात सहन करणार नाही. हा वाद अजून न्यायालयात प्रलंबित आहे. जो पर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत माघार घेतली जाणार नाही’, असा इशारा त्यांनी दिला.
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि उद्धव ठाकरे वादावर चव्हाण यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. ते म्हणाले, ‘वैयक्तिक वादात मला पडायचे नाही. आज राज्यासमोर अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत आणि हे प्रश्न सोडविण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे.’
Shrigonda Market Committee : बाजार समिती निवडणूक भाजप-काँग्रेस एकत्र लढवणार
भाजपचे डाव यशस्वी होणार नाही
‘रामनवमीच्या दिवशी ठिकठिकाणी दंगे फसाद केले गेले. जेव्हा भाजपला यशाची खात्री नसते त्यावेळी ते दंगे करतात. आता मात्र त्यांचा हा डाव यशस्वी होणार नाही. लोकांच्या आता हे लक्षात आले आहे. त्यामुळे जनता फसणार नाही’, असेही चव्हाण यावेळी म्हणाले.