Download App

Dharashiv APMC Election : राणा पाटलांनी सत्ता राखली; 17 जागा जिंकत भाजप सुसाट

APMC Election Result : धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. या निवडणुकीत भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटलांनी वर्चस्व कायम राखले आहे.

अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाली. यात आमदार राणा पाटील व शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. महायुतीने 18 पैकी 17 जागा जिंकत राणा पाटील यांनी वर्चस्व कायम ठेवले, तर महाविकास आघाडीला व्यापारी मतदारसंघाची 1 जागा मिळाली.

प्रताप ढाकणेंच्या ताब्यातील बाजार समिती राजळेंनी हिसकावली !

विजयानंतर भाजप – शिवसेना कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्याची आतिषबाजी करत मिरवणूक काढली. या मिरवणुकीत स्वतः राणा पाटील सहभागी झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी जेसीबीमधून गुलाल व पुष्पवृष्टी करून आनंद साजरा केला.

भाजपने बाजार समिती हिसकावली

नगर जिल्ह्यातील पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजपने राष्ट्रवादीला जोरदार हिसका दिला आहे. भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वात निवडणुकीत तब्बल सतरा जागा भाजपने जिंकल्या आहेत. राष्ट्रवादीच्या प्रताप ढाकणे यांच्या गटाला अवघी एक जागा मिळाली आहे.

राष्ट्रवादीचीच सत्ता

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचेच वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले आहे. या निवडणुकीत 18 पैकी 17 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे.

इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणीला सकाळी आठ पासून सुरवात झाली होती. मतमोजणी शांततेत पार पडली. ही मतमोजणी इस्लामपूर पंचायत समितीच्या पाठीमागील शेतकरी बचत धाम मध्ये सुरु आहे. एकूण 13 टेबलांवर मतमोजणी सुरु असल्याने मतमोजणी जलद गतीने पार पडली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Tags

follow us