Deepak Kesarkar replies Uddhav Thackeray : शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटात वैमनस्य वाढले आहे. शिवसेनेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः शिंदे गटावर जोरदार हल्ले चढवत आहेत. शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या गद्दारांना आपल्याला पाडायचं आहे असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यांच्या याच वक्तव्याचा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी समाचार घेतला आहे.
ते म्हणाले, आम्ही भाजपबरोबर युती करून गेलो आहोत. कुणालाही फसवलं नाही. निवडणूक युतीत लढायची आणि नंतर मात्र स्वतःच्या मुख्यमंत्रीपदासाठी तडजोड करायची असे तरी आम्ही केलेले नाही. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी तडजोड केली. त्यामुळे आमदार, खासदार सोडून गेले, पक्ष आणि चिन्हही मिळालं नाही. गद्दार कोणाला म्हणायच याची व्याख्या ठरली पाहिजे. आम्ही कधी उद्धव ठाकरेंना गद्दार म्हणणार नाही. कारण, त्यांच्याबद्दल आम्हाला आजही आदर आहे, असे केसरकर म्हणाले.
Chandrakant Patil : आगामी लोकसभेत मोदीच पंतप्रधान, मोदींशिवाय समोर दुसरं आहे तरी कोण?
केंद्राच्या सत्तेतून भाजपला बेदखल करण्यासाठी विरोधकांनी INDIA नावाची आघाडी तयार केली. पाटणा, बंगळुरूनंतर या आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होत आहे. यामध्ये आता उद्धव ठाकरेंना पंतप्रधान बनवायचं अशी चर्चा सुरू झाली आहे. यावरही केसरकरांनी प्रतिक्रिया दिली. आता उद्धव ठाकरेंनी त्याकडे लक्ष दिले पाहिजे. मतदारसंघाची निवड करून लोकसभा निवडणुकीची तयारी केली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर आपण टिकू शकतो का? याचा विचार त्यांनी केला पाहिजे असा खोचक टोला केसरकरांनी लगावला.
ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रमोद शेंडे यांच्या नेतृत्वात सायन कोळीवाडा येथील शिवसैनिक काल उद्धव ठाकरे यांना भेटायला आले होते. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ज्यांना जायचं आहे त्यांना जाऊ द्या, जे गेलेत त्यांना जय महाराष्ट्र. आता त्यांचा आणि आपला संबंध तुटला. आता गेल्यानंतर त्यांनी पक्षाशी गद्दारी करू नये. पक्षाच्या विरोधात काम करू नये अन्यथा शिवसैनिक म्हणून त्यांना दाखवावेच लागेल असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी पक्ष सोडून शिंदे गटात दाखल झालेल्या नेत्यांना दिला होता.