Download App

विधीमंडळात विरोधी पक्षनेता असणार का? हंगामी अध्यक्ष कोळंबकर म्हणाले, ‘जर विरोधकांनी…’

भाजपचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर (Kalidas Kolambkar) यांनी शपथ घेतली असून त्यांनी विरोधीपक्ष नेतेपदाबाबत मोठं विधान केलंय.

  • Written By: Last Updated:

मुंबई : महाराष्ट्रात महायुती सरका (Mahayuti Govt) स्थापन झाले असून मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तर उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि अजित पवार (Ajit Pawar) विराजमान झालेत. मात्र विरोधीपक्ष नेतेपदी कोण बसणार की नाही? यावर चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यातच महाराष्ट्र विधानसभेचे हंगामी अध्यक्षपदी भाजपचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर (Kalidas Kolambkar) यांनी शपथ घेतली असून त्यांनी विरोधीपक्ष नेतेपदाबाबत मोठं विधान केलंय.

Cabinet expansion : केसरकर, सावंत अन् सत्तारांना मिळणार डच्चू, DCM शिंदे नव्या चेहऱ्यांना देणार संधी… 

महाराष्ट्र राज्यात आता देवेंद्र पर्वाला सुरुवात झालीय. परंपरेनुसार विधानसभा निवडणूक आटोपल्या नंतर सरकार स्थापन होताच सर्व नवनिर्वाचित आमदारांना दोन दिवसात विधानसभा सदस्यत्वाची (आमदारकीची ) शपथ घ्यावी लागते. त्यासाठी महाराष्ट्र विधानसभा हंगामी अध्यक्ष म्हणून भाजपचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती झाली. राजभवनात पार पडलेल्या कार्यक्रमात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी कालिदास कोळंबकर यांना विधानसभा हंगामी अध्यक्षपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे.

पुण्याचा दादा कोण? पालकमंत्रीपदावरुन महायुतीत रस्सीखेच; चंद्रकांतदादांचंही गुगली उत्तर 

नवनिर्वाचित आमदार कधी घेणार शपथ?
त्यानंतर आता 7,8 आणि 9 तारखेत विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनामध्ये नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात येईल. 9 तारखेला राज्यपालांचे अभिभाषण आणि विधानसभा अध्यक्ष यांची निवड केली जाईल.

मी भाग्यवान – कोळंबकर
दरम्यान, हंगामी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कालिदास कोळंबकर यानी माध्यमांशी संवाद साधला. मी नशिबवान असून काम करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या सारख्या माणसाला शपथ देण्याचा आनंद मला होतोय. माझ्या आमदारकीची ही नववी टर्म असून पक्षाने माझा भविष्यात देखील विचार करावा, अशी अपेक्षा कोळंबकर यांनी व्यक्त केली.

नव्या महायुती सरकारचे हिवाळी अधिवेशन विरोधी पक्षनेत्याशिवाय होण्याची शक्यता आहे. याबाबत बोलतांना कोळंबकर म्हणाले की, विधिमंडळ कामकाज प्रक्रियेनुसार सर्व कामकाज पार पडेल. विरोधीपक्ष नेतेपदाबाबत काहीही आखणी आलेली नाही, विरोधकांनी जर सविस्तर आखणी आणली तर विरोधी पक्ष नेत्याला देखील शपथ देऊ, असं कोळंबकर म्हणाले.

विरोधीपक्ष नेतेपदाचे काय?
विरोधीपक्ष नेतेपदावर विराजमान होण्यासाठी लागणारे संख्याबळ विरोधी पक्षातील एकाही पक्षाकडे नाही. त्यामुळे पाच वर्षाच्या कार्यकाळात राज्याला विरोधीपक्ष नेता लाभणार नाही, असं बोलले जातंय. मात्र, तिन्ही पक्षांनी सर्वानुमते एकाची विरोधी पक्षनेता म्हणून निवड केली तरी तशा प्रकारची प्रथा अस्तित्वात नसल्याचे विधिमंडळाचे निवृत्त प्रधान सचिव अनंत कळसे यांनी म्हटलंय. मात्र त्याला मान्यता द्यायचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना असतो. मात्र त्यांनी सदर निर्णय नाकारला तर त्याला आव्हान दिले जावू शकत नाही,असं अनंत कळसे म्हणाले.

 

follow us