Download App

Cabinet expansion : केसरकर, सावंत अन् सत्तारांना मिळणार डच्चू, DCM शिंदे नव्या चेहऱ्यांना देणार संधी…

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक केसरकर , अब्दुल सत्तार (Abdul Sattar) आणि तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळाकडून डच्चू मिळण्याची शक्यता आहे

  • Written By: Last Updated:

Cabinet expansion : शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंद (Eknath Shinde) राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत कठोर भूमिका घेण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक केसरकर (Deepak Kesarkar) , अब्दुल सत्तार (Abdul Sattar) आणि तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांना मंत्रिमंडळाकडून डच्चू मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्याऐवजी नवीन आमदारांना संधी दिली जाणार आहे.

पुण्याचा दादा कोण? पालकमंत्रीपदावरुन महायुतीत रस्सीखेच; चंद्रकांतदादांचंही गुगली उत्तर 

काल आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता 11 किंवा 12 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो. आपली मंत्रिमंडळात वर्णी लागावी यासाठी आमदारांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. मात्र, एकनाथ शिंदे शिवसेना आमदारांना मंत्रिपद देताना कठोर निकष लावणार असल्याची माहिती आहे.

वंचित बहुजन आघाडीचे ईव्हीएम विरोधात आंदोलन, नगर शहरात स्वाक्षरी मोहीम सुरु 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे कठोर निकष लावून मंत्रिपदे देणार आहेत. पक्षसंघटना वाढवणारे आणि जे पात्र असतील त्यांनाच मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार आहे. शिवसेना पक्ष संघटना वाढीसाठी योगदान काय, याचा विचार मंत्रिपद देतांना केला जाणार आहे. निवडणूक प्रचारात किती साथ दिली? याचा विचारसुध्दा केली जाणार आहे. याशिवाय सेवाज्येष्ठतेच्या मुद्द्यावर मंत्रिपद दिले जाणार नसल्याचीही माहिती समोर आली आहे.

तसेच यंदाच्या मंत्रिमंडळातून शिवसेनेच्या तीन दिग्गज मंत्र्यांचा पत्ता कट होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळाकडून डच्चू मिळण्याची शक्यता आहे.

शिवसेनेच्या मंत्र्यांची संभाव्य यादी-
1. एकनाथ शिंदे
2. उदय सामंत
3. शंभूराज देसाई
4. गुलाबराव पाटील
5. संजय शिरसाट
6. भरत गोगावले
7. प्रकाश सुर्वे
8. प्रताप सरनाईक
9. राजेश क्षीरसागर
10. आशिष जैस्वाल
11. निलेश राणे

गृहखाते कोणाला मिळणार?
मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतलेले एकनाथ शिंदे गृहमंत्रीपदावर ठाम आहेत. शिंदे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते. त्यावेळी फडणवीस यांनी गृहमंत्रीपद स्वतःकडे ठेवले होते. आता फडणवीस मुख्यमंत्री झाल्याने ‘नैसर्गिक न्यायाने’ आम्हाला गृहमंत्रीपद मिळावे, असा आग्रह शिवसेना धरत आहे. गृहखात्यासोबतच नगरविकास मंत्रालय देखील शिंदेंना हवं आहे. मात्र या दोन्ही मंत्रालयांवर भाजपची नजर आहे.

 

follow us