पुण्याचा दादा कोण? पालकमंत्रीपदावरुन महायुतीत रस्सीखेच; चंद्रकांतदादांचंही गुगली उत्तर

पुण्याचा दादा कोण? पालकमंत्रीपदावरुन महायुतीत रस्सीखेच; चंद्रकांतदादांचंही गुगली उत्तर

Chandrakant Dada Patil Statement On Guardian Minister : राज्यात काल 5 डिसेंबर रोजी महायुती सरकारचा शपथविधी पार पडला. देवेंद्र फडणवीस (BJP) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तर त्यांच्यासोबत अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान पालकमंत्रीपदावरुन महायुतीत रस्सीखेंच होणार का? हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे. तर पुणेकरांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री कोण असणार? याचे वेध लागलेले आहेत. यावर आता भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांची (Chandrakant Dada Patil) प्रतिक्रिया समोर आली आहे.

चंद्रकांत पाटलांना पुण्याच्या पालकमंत्रिपदावरून (Guardian Minister Of Pune) प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की, पुणे पालकमंत्री पदाचा प्रश्न तुम्ही अशा माणसाला प्रश्न विचारला, ज्याला ज्याला प्रश्न ही तोच उत्तरही तेच. माझे श्रेष्ठी जे सांगतील ते मी करतो. कार्यकर्ते म्हणतात पालकमंत्री चंद्रकांत पाटील हवेत, यावर बोलताना ते म्हणाले की, कार्यकर्ताच काय नेताही चांगलं मिळावं, अशी इच्छा व्यक्त करत असतो. सर्व इच्छा पूर्ण होत नसतात. ज्यावेळेला अनेक सहयोगी पक्षांना बरोबर घेऊन जायचं असतं, त्यावेळी नेहमी समजूतदारपणा दाखवायचा असतो. भविष्यामध्ये , काय दडलं आहे, हे मला माहीत नाही असं चंद्रकांत दादा पाटील म्हणाले आहेत.

DCM शिंदेंना गृहमंत्रालय मिळण्याची शक्यता धूसर, गृहखात्यासह नगरविकास खातेही भाजपकडे जाणार

यावेळी चंद्रक्रांत दादा पाटलांना जिल्हा परिषदेचा 133 कोटी निधी परत गेला, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी ते माध्यमांना म्हणाले की, तुमचा रोल मोठा आहे. बऱ्याच गोष्टी तुमच्याकडून कळतात. आता मी शोध घेईल. पण परत गेलेला निधी पुन्हा एकदा रुटीन सुरू झाल्यानंतर घेता येतो. त्याचसोबत चंद्रक्रांत दादा यांनी शपथविधी सोहळ्यावरून विरोधकांवर देखील निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, शपथविधी बंदिस्त खोलीमध्ये नव्हता. नाना पटोलेंसारख्या एका पक्षाच्या अध्यक्षांना निमंत्रण गेलं होतं. ते म्हणतील गेलं नव्हतं, मी म्हणतो गेलं होतं. देवेंद्रजींनी शेकडो फोन केल्याचं देखील पाटील म्हणाले आहेत.

रोहित, कोहली अन् पंत फ्लॉप…., स्टार्कने दिला भारताला धक्का, टीम इंडिया 180 धावांवर ऑलआऊट

मंत्रिमंडळ विस्ताराचं कळलं की तुम्हाला कळवतं असं चंद्रकांत दादा पाटील म्हणाले आहेत. पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात बोलताना त्यांनी सांगितलं की, प्रशासन कारवाई करतंय. पुणे पोलिस अलर्ट आहेत, छडा लावतील. दरम्यान पुण्याचे पालकमंत्री कोण असेल? हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. काल आझाद मैदानावर पार पडलेल्या शपथविधी सोहळ्याला मात्र नाना पटोलेंनी हजेरी लावली नव्हती, यावरून त्यांच्यावर चंद्रकांत दादा पाटलांनी हल्लाबोल केलाय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube