Chandrakant Patil : “हू इज धंगेकर”वर पराभवानंतर चंद्रकांत पाटील म्हणतात…

  • Written By: Published:
Chandrakant Patil : “हू इज धंगेकर”वर पराभवानंतर चंद्रकांत पाटील म्हणतात…

पुणे : राज्याचं लक्ष लागलेल्या कसबा पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाचा धक्का बसला आहे. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर तब्बल ११ हजार मतांनी निवडून आले आहेत. पण कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील प्रचारादरम्यान ‘हू इज धंगेकर’ म्हणत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रवींद्र धंगेकर यांना हिणवले होते. त्यावर निवडणूक जिंकल्यावर ‘मी आहे धंगेकर’ असे उत्तर आमदार रवींद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिले.

हेही वाचा : Shinde VS Thackeray : उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी मराठी मुस्लिम सेवा संघाचं पत्रक, केलं ‘हे’ आवाहन

कसबा मतदार संघात पराभव झाला असला तरी चिंचवडमध्ये मात्र भाजपाला आपला गड राखता आला आहे. चिंचवडमध्ये भाजपाच्या अश्विनी जगताप यांनी विजय मिळवला आहे. विजयानंतर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नवनिर्वाचित आमदार अश्विनी जगताप यांची भेट घेत अभिनंदन केले. अश्विनी जगताप यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचा दारुण पराभव केला आहे.

चिंचवड दौऱ्यावर असताना पालकमंत्री पाटील यांना विचारले असता ‘ठीक आहे: म्हणत त्यांनी बोलणे टाळले. कसबा हा भाजपचा गड मानला जात होता. हा मतदारसंघ सलग २८ वर्षे भाजपकडे होता. विद्यमान खासदार गिरीश बापट यांनी सलग २५ वर्षे तर दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांनी तीनवर्षे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube