DCM शिंदेंना गृहमंत्रालय मिळण्याची शक्यता धूसर, गृहखात्यासह नगरविकास खातेही भाजपकडे जाणार
Cabinet expansion : काल आझाद मैदानावर (Azad Maidan) महायुती (Mahayuti) सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde,), अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यात सरकार स्थापन झालं असलं तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet expansion) बाकी आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराकडे अनेकाचं लक्ष लागलं. अशातच गृहमंत्रीपदासाठी (Home Ministry) भाजपा (BJP) आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा आहे.
वंचित बहुजन आघाडीचे ईव्हीएम विरोधात आंदोलन, नगर शहरात स्वाक्षरी मोहीम सुरु
मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा झाल्यानंतर आता 11 किंवा 12 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो. हिवाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. त्यामुळं मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळावं, यासाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु झाली. याशिवाय गृहखाते आणि अर्थखात्यासाठी तिन्ही पक्ष आग्रही आहेत.
मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतलेले एकनाथ शिंदे गृहमंत्रीपदावर ठाम आहेत. शिंदे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते. त्यावेळी फडणवीस यांनी गृहमंत्रीपद स्वतःकडे ठेवले होते. आता फडणवीस मुख्यमंत्री झाल्याने ‘नैसर्गिक न्यायाने’ आम्हाला गृहमंत्रीपद मिळावे, असा आग्रह शिवसेना धरत आहे. गृहखात्यासोबतच नगरविकास मंत्रालय देखील शिंदेंना हवं आहे. मात्र या दोन्ही मंत्रालयांवर भाजपची नजर आहे. त्यामुळे दोन्ही खाती भाजपकडे जाण्याची दाट शक्यता आहे.
संजय राऊतांपासून ठाकरे गटाला धोका, त्यांना आवरा, अन्यथा…; शंभूराज देसाईंचं सूचक विधान
एकनाथ शिंदे 2019 पासून नगरविकासाची जबाबदारी सांभाळत आहेत. याच मंत्रालयाच्या माध्यमातून त्यांनी सेनेच्या आमदारांना मोठा निधी दिला. आता आगामी काळात महापालिकेच्या निवडणुका होणार असल्यानं त्यांन नगरविकास मंत्रालय हवं आहेत.
तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्यासाठी अर्थखाते मिळवण्यावर ठाम आहे, यामध्ये सहकार, कृषी, अन्न आणि नागरी पुरवठा, बंदरे, मदत आणि पुनर्वसन, सिंचन, सामाजिक न्याय, महिला आणि बालविकास या खात्यासाठी राष्ट्रवादी आग्रही आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात भाजपचे 10, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी 9 मंत्री होते. आता नव्या मंत्रिमंडळात भाजपचे 20 ते 22 मंत्री असण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीला किती मंत्रिपद मिळणार याची उत्सुकता आहे.