संजय राऊतांपासून ठाकरे गटाला धोका, त्यांना आवरा, अन्यथा…; शंभूराज देसाईंचं सूचक विधान

  • Written By: Published:
संजय राऊतांपासून ठाकरे गटाला धोका, त्यांना आवरा, अन्यथा…; शंभूराज देसाईंचं सूचक विधान

Shambhuraj Desai on Sanjay Raut: नुकताच महाराष्ट्रात नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर अजित पवार (Ajit Pawar) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी पुन्हा एकदा टीकेच्या फैरी झडू लागल्या. आता शिवसेना नेते शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली.

EVM पडताळणीसाठी ‘या’ जिल्ह्यातून उमेदवाराचा एकही अर्ज नाही 

संजय राऊतांना जर आता आवरलं नाही तर उरले सुरलेले ठाकर गटातील आमदारांचं काही खरं नाही, असं सूचक विधान देसाईंनी केलं.

शंभूराज देसाईंनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ठाकरे गटाचे आमदार राऊत यांच्याबद्दल खाजगीत काय बोलतात? ते आम्हाला राऊतांमुळंच आमच्यावर ही वेळ आली असं सांगतात. त्या आमदारांनाही माझंही आवाहन आहे. राऊतांपासून सावध रहा. एसटीच्या मागे जसं लिहिलं असतं सुरक्षित अंतर ठेवा, तर उबाठाच्या आमदारांनी राऊतांपासून सुरक्षित अंतर ठेवावे, अन्यथा त्यांचं भविष्य फार चांगलं नाही, संजय राऊतांपासून ठाकरे गटाला धोका आहे, असं देसाई म्हणाले.

रोहित, कोहली अन् पंत फ्लॉप…., स्टार्कने दिला भारताला धक्का, टीम इंडिया 180 धावांवर ऑलआऊट 

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडी स्थापन करायला सांगितलं. राऊतांचे ऐकल्याने आज उबाठाची ही अवस्था झाली, असंही देसाई म्हणाले.

यावेळी देसाईंनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. 2019 मध्ये सत्ता स्थापनेवेळी उद्धव ठाकरे यांनी आमदारांकडे बोट दाखवत ‘मला तुमच्यातल्या एकाला मुख्यमंत्री करायचे आहे, असं म्हटलं होतं. मात्र कालांतराने त्यांचं ते बोट स्वतःकडे कसं वळलं? मग खुर्चीचा मोह कोणाला आहे, ते ओळखावं, असा टोला शंभूराज देसाईंनी लगावला.

उपमुख्यमंत्री नाराज आहेत, असं राऊतांनी म्हटलं. यावर बोलतांना शंभुराज देसाई म्हणाले की, उपमुख्यमंत्री नाराज आहेत, हे तुम्ही त्यांना त्यांच्या देहबोलीवरून लगेच ओळखू शकत नाही. शिंदेंच्या पोटात एक आणि ओठात एक कधीच नसतं. अजितदादांच्या महायुतीत सहभागी झाल्यानं काहीसी रस्सीखेच पाहायला मिळाली होती. मात्र, आता तिघांमध्येही समन्वय आहे. योग्य तो मान पान आणि खेळीमेळीच्या वातावरणात मंत्रीमंडळ वाटप होईल, असं शंभूराज देसाई म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube