MLA Ashutosh Kale : राज्यातील जनतेला महायुती शासनाने दिलेला विकासाचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी जनतेने देखील विधानसभा निवडणुकीत भरभरून मतदान दिले आहे. राज्यात स्थापन झालेले महायुती सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अनुभवातून राज्याला प्रगतीच्या दिशेने घेवून जाईल असा विश्वास आ.आशुतोष काळे यांनी व्यक्त केला आहे.
गुरुवार (दि.05 ) रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर मोठ्या थाटामाटात राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेवून त्यांच्या सोबतीला अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्याबद्दल आ.आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांनी त्यांचे अभिनंदन करून आपल्या शुभकामना व्यक्त केल्या आहेत.
महायुती सरकारने राज्याच्या विकासासाठी एक नवीन दृष्टिकोन स्वीकारला आहे, ज्यामध्ये सर्वच क्षेत्रांतील प्रगतीसाठी सुसंगत आणि समन्वित धोरणांची रचना करण्यात आली आहे. महायुती सरकारने मागील अडीच वर्षात देखील नेत्रदीपक कामगिरी केली असून प्राधान्याने महिला, औद्योगिक विकास, कृषी क्षेत्रातील सुधारणा, रोजगार निर्माण करणे, गरीब व दुर्बल घटकांचे कल्याण, आणि राज्याच्या सर्वांगीण सामाजिक व आर्थिक समृद्धीचे धोरण सर्वसामान्य जनतेला आवडले आहे. जनतेच्या आशीर्वादाने मिळालेल्या भरभक्कम बहुमताच्या जोरावर यापुढील काळातही राज्यात विकासाची गंगा अविरतपणे सुरु राहून महाराष्ट्र राज्य विकासाच्या शिखरावर गेल्याशिवाय राहणार नाही.
लाडकी बहीण योजना सुरुच राहणार, पण …, पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठं वक्तव्य
महायुती सरकारच्या काळात देखील कोपरगाव मतदार संघातील अनेक विकास कामे मार्गी लावण्यात यशस्वी झालो असून यापुढील पाच वर्षात यापेक्षा जास्त विकास करून दाखविण्यासाठी मोठा वाव मिळणार आहे. त्या संधीचा फायदा घेवून महायुती सरकारच्या माध्यमातून कोपरगाव मतदार संघ जिल्ह्यात विकासाच्या बाबतीत अव्वल करणार असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी शेवटी म्हटले आहे.