लाडकी बहीण योजना सुरुच राहणार, पण …, पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठं वक्तव्य

  • Written By: Published:
लाडकी बहीण योजना सुरुच राहणार, पण …, पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठं वक्तव्य

Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 12 दिवसांनी आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेतली आहे. मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधी पार पडला. यानंतर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल (Ladki Bahin Yojna) बोलताना सूचक विधान केलं आहे. लाडकी बहीण योजना सुरु राहणार आहे. मात्र बजेटच्या वेळेस यासंदर्भात विचार करू असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना, देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लाडकी बहीण योजना सुरु राहणार आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार आहोत. बजेटच्या वेळेस यासंदर्भात विचार करू. आमचे आर्थिक स्त्रोत यांच्याशी विचारविनिमय करून हा निर्णय घेण्यात येणार आहे. आम्ही जाहीरनाम्यात जी आश्र्वासने दिली होती ती आम्ही पूर्ण करू. ही आश्र्वासने पूर्ण करण्यासाठी जी व्यवस्था करावी लागते ती आधी करू. निकषाच्या बाहेर कोणी भेटला, तक्रारी आल्या तर त्याचा विचार करण्यात येईल असं या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शेतकरी सन्मान योजनेतही सुरुवातीला जे लाभार्थी होते तेव्हाही लक्षात आलं होतं की मोठ्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळतोय आणि त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं आम्ही निकषात बसत नाही . त्यामुळे जर लाडकी बहीण योजनेत जर काही महिला निकषाच्या बाहेर जात असतील तर त्याचा पुनर्विचार केला जाईल पण योजनेचा सरसकट पुर्नविचार करण्याचं कारण नाही. असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मोठी बातमी! 9 डिसेंबरला होणार विधानसभा अध्यक्षांची निवड, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

अध्यक्ष जो निर्णय घेईल तो मान्य

विधानसभा अध्यक्षांची निवड 9 डिसेंबर रोजी होणार आहे. खाते वाटपाबाबत चर्चा अंतिम टप्प्यात आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार आणि मी एकत्र बसून निर्णय घेणार आहोत. विधानसभा विरोधी पक्षनेते बाबत विधानसभा अध्यक्ष जो निर्णय घेणार तो आम्हाला मान्य असेल अशी माहिती देखील या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube