मोठी बातमी! 9 डिसेंबरला होणार विधानसभा अध्यक्षांची निवड, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

  • Written By: Published:
मोठी बातमी! 9 डिसेंबरला होणार विधानसभा अध्यक्षांची निवड, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

Devendra Fadnavis : विधानसभा अध्यक्षांची निवड 9 डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर देंवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पहिली पत्रकार परिषद घेतली.

या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष पदाची निवड 09 डिसेंबरला होणार असल्याची माहिती दिली. तसेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार असल्याची देखील माहिती त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये दिली. तसेच पुढील पाच वर्ष राज्याला स्थिर सरकार देणार असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मंत्रिमंडळाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. नागपूर अधिवेशन 9 डिसेंबरपासून सुरु होणार असून पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवड होणार आहे. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले. तसेच पुढील पाच वर्ष राज्याला स्थिर सरकार देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे आणि आम्ही निवडणुकीच्या जाहीरनामन्यात दिलेल्या सर्व आश्वासने पूर्ण करणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिली.

अजित पवारांचा नवीन विक्रम, सहाव्यांदा घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

खाते वाटपबाबत आम्ही तिन्ही मिळून निर्णय घेणार आहे आणि लवकरच खाते वाटप जाहीर करण्यात येणार आहे. तसेच विरोधीपक्ष नेतेबाबत विधानसभा अध्यक्ष जो निर्णय घेणार तो आम्हाला मान्य असेल असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मराठा समाजाला न्याय देणार

या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबाबत देखील भाष्य केले आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, यापूर्वी देखील मराठा समाजाला न्याय देण्याचे काम आमच्या सरकारने केलं होतं आणि आता देखील मराठा समाजाला न्याय देण्याचे काम आम्ही करणार आहोत. असं पत्रकार परिषदेमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले.

एकनाथ शिंदे नाराज नाही

महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नाही. एकनाथ शिंदे नाराज नव्हते मात्र एकनाथ शिंदे नाराज असल्याचे बातम्या पसरवण्यात आले. एकनाथ शिंदे नाराज नसून आम्ही एकत्रपणे काम करणार आहोत. असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube