अजित पवारांचा नवीन विक्रम, सहाव्यांदा घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ
Ajit Pawar Oath : मुंबईतील आझाद मैदानावर झालेल्या ग्रँड शपथविधी सोहळ्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी सहाव्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून सहाव्यांदा शपथ घेणारे एकमेव नेते ठरले आहे. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) , केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman), रक्षामंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) , भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यासह वेगवेगळ्या राज्याचे मुख्यमंत्री तसेच शाहरुख खान (Shahrukh Khan) , सलमान खान (Salman Khan) यांच्यासह बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते.
अजित पवार सलग आठव्यांदा बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणून आले आहे. या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांचा तब्बल 1 लाखांच्या फरकाने पराभव केला होता.
अजित पवार यांनी 2010 मध्ये पहिल्यांदा पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यानंतर त्यांनी दुसऱ्यांदा 2012 मध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. तर 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि 2023 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतुत्वाखालील महायुती सरकारमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.
तर आज 6 डिसेंबर रोजी त्यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतुत्वाखालील सरकारमध्ये सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.
तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना अजित पवार यांच्याकडून सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे एकूण 7.20 लाख रुपये रोख असल्याची माहिती त्यांनी दिली होती. तर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे 6,65,400 रुपये रोख आहेत. तर अजित पवार यांनी बँकेत ठेवीच्या रुपात 3 कोटी 9 लाख 69 हजार 53 रुपये ठेवले आहे आणि त्यांची पत्नी सुनेत्र पवार यांच्या बँक खात्यात 3 कोटी 69 लाख 92 हजार 91 रुपये असल्याची माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रात दिली होती.
2.85 लाखांचा डिस्काउंट, टाटाची ‘या’ कारवर धमाकेदार ऑफर, खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
राज्यात दुसऱ्यांदा महायुती सरकारची स्थापना झाली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीला मोठा धक्का देत 288 पैकी 236 जागांवर विजय मिळावला आहे. यामध्ये भाजपला 231, शिवसेना शिंदे गटाला 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 41 जागा मिळाले आहे. तर महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गट 20, काँग्रेस 16 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला 10 जागांवर विजय मिळाला आहे.