2.85 लाखांचा डिस्काउंट, टाटाची ‘या’ कारवर धमाकेदार ऑफर, खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
Tata Nexon Discount Offer : देशातील लोकप्रिय ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्सने ग्राहकांसाठी एक धमाकेदार ऑफर जाहीर केली आहे. या ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही तुमच्यासाठी अगदी कंपनी किमतीमध्ये जबरदस्त फीचर्स आणि शक्तीशाली इंजिनसह येणारी कार घरी आणू शकतात.
कंपनीने डिसेंबर महिन्यात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी लोकप्रिय कार Tata Nexon एसयूव्हीवर बंपर डिस्काउंट ऑफर देत आहे. माहितीनुसार, कंपनी वर्ष 2023 (MY2023) च्या Nexon SUV वर 2.85 लाख रुपयांची सूट देत आहे. अनेक डीलर्सकडे MY2023 चा स्टॉक शिल्लक असल्याने कंपनीने बंपर डिस्काउंट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जर तुम्ही डिसेंबर महिन्यात Nexon खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी असू शकते.
या ऑफरमध्ये तुम्हाला एक्सचेंज किंवा स्क्रॅपेज बोनससह रोख सवलत देखील मिळणार आहे. याच बरोबर MY2024 Nexon वर ग्राहकांना र 45,000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.
Tata Nexon फीचर्स
कंपनीने या कारमध्ये एकापेक्षा एक मस्त मस्त फीचर्स दिले आहे. या कारच्या इंटीरियरमध्ये HVAC नियंत्रणांसाठी टच-आधारित पॅनेल देण्यात आले आहे. तसेच डॅशबोर्डला लेदर इन्सर्ट्स आणि फिनिशसारखे कार्बन-फायबरदेखील देण्यात आले आहे. तसेच टॉप-स्पेक Nexon ला 10.25-इंच फ्लोटिंग टचस्क्रीन आणि त्याच आकाराचे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळते, जे नेव्हिगेशनसाठी देखील वापरले जाऊ शकते.
याचबरोबर 360-डिग्री कॅमेरा, कनेक्ट केलेले कार तंत्रज्ञान, एक वायरलेस चार्जर, एअर प्युरिफायर, व्हॉइस-असिस्टेड सनरूफ सारखे फीचर्स कंपनीने दिले आहे. तर सुरक्षेसाठी 6 एअरबॅग्ज, ESC, सर्व प्रवाशांसाठी तीन-पॉइंट सीट बेल्ट, ISOFIX आणि ब्रेकडाउन कॉल असिस्ट सारखे फीचर्स या कारमध्ये देण्यात आले आहे.
Nexon मध्ये 1.2-लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन कंपनीकडून देण्यात आले आहे. जे 120hp पॉवर आणि 170Nm टॉर्क जनरेट करते. याशिवाय, 1.5-लिटर डिझेल इंजिन उपलब्ध असेल, जे 115hp पॉवर आणि 260Nm टॉर्क जनरेट करते. दोन्ही इंजिन सध्याच्या 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड AMT सह उपलब्ध असतील. पेट्रोल इंजिन 5-स्पीड मॅन्युअल किंवा 7-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्स (पॅडल शिफ्टर्ससह) पर्यायांसह देखील उपलब्ध असेल.
राज्यात राजकीय घडामोडींना वेग, दिल्लीत प्रियंका गांधींनी घेतली अमित शाहांची भेट, नेमकं कारण काय?
डिस्क्लेमर: ही सवलत तुमच्या शहरात किंवा डीलरमध्ये कमी-अधिक असू शकते. कार खरेदी करण्यापूर्वी, डिस्काउंटशी संबंधित सर्व तपशील जाणून घ्या.