Download App

प्रतिकात्मक अंत्ययात्रा अन् श्वानाच्या गळ्यात फोटो; गोपीचंद पडळकरांविरोधात कोल्हापुरात निषेध आंदोलन

Gopichand Padalkar : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि त्यांच्या कुटुंबाबाबत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी वादग्रस्त

  • Written By: Last Updated:

Gopichand Padalkar : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि त्यांच्या कुटुंबाबाबत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यभरातील राजकीय वातावरण तापले आहे. गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्या वादग्रस्त विधानावर माफी मागण्यासही नकार दिल्यामुळे संतापाचा उद्रेक सर्वत्र वाढला आहे.

कोल्हापुरातही शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून (NCPSP) जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. पडळकरांविरोधात कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी श्वानाच्या प्रतिमेला गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांचा चेहरा जोडलेले पोस्टर हातात धरले होते. पोस्टरला जोडे मारत आणि तिरडीवर ठेवलेली गोपीचंद पडळकर यांची प्रतिमा पायदळी तुडवून प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला.  विशेष म्हणजे या आंदोलनावेळी एका श्वानाच्या गळ्यातही गोपीचंद पडळकर यांची प्रतिमा लटकावण्यात आली होती.

गोपीचंद पडळकरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला होता. दरम्यान हे भाजपचे षडयंत्र असून भाजपची मातृसंस्था असलेल्या आरएसएसची संस्कृती यामधून दिसून येत आहे. याला सर्वस्वी जबाबदार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांनी गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी या आंदोलनावेळी करण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

सांगलीच्या जत तालुक्यातील कनिष्ठ अभियंता अवधूत वडार आत्महत्या प्रकरणावरून  18 सप्टेंबर रोजी आमदार पडळकर यांच्या नेतृत्वाखाली जत येथे जयंत पाटलांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चा दरम्यान जयंत पाटलांवर (Jayant Patil) टीका करताना पडळकर म्हणाले की, माणसं पाठवली कशासाठी? गोपीचंद पडळकरने कुठल्या व्यापाऱ्याकडून पैसे घेतले का? अरे जयंत पाटला तुझ्या सारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची  नाही. माझ्यात कार्यक्रम करायची ती धमक आहे. तुझ्यासारखी ती अवलाद नाही. एवढ्या खालच्या लेव्हलला? आता माझा दांडीयाचा कार्यक्रम आहे. ये बघायला. तुझे डोळे दिपून जातील कार्यक्रम बघून अशी टीका आमदार पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केली.

ब्रेकिंग : पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी 5 वाजता करणार देशाला संबोधित, मोठी घोषणा होणार?

तसेच यावेळी बोलताना पडळकर यांनी जयंत पाटलांवर वैयक्तिक टीका करत जयंत पाटील हे राजारामबापू पाटील यांची औलाद वाटत नाही, काहीतरी गडबड आहे,अशा शब्दात खालच्या पातळीवर जाऊन आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली होती. यानंतर विरोधकांकडून या प्रकरणात आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

follow us