मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधात लढत नाही! जयंत पाटलांनी गोपीचंद पडळकरांना डिवचलं…

मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधात लढत नाही! जयंत पाटलांनी गोपीचंद पडळकरांना डिवचलं…

Jayant Patil Criticize Gopichand Padalkar : गेल्या काही दिवसांपासून भाजप (BJP) आमदार गोपीचंद पडळकर हे (Gopichand Padalkar) राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील ( Jayant Patil) यांच्यावर सातत्याने टीका करत होते. पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतरही पक्ष सोडणार नसल्याची घोषणा केली होती. त्यानंतर पडळकर यांनी त्यांच्या राजकीय भूमिकेवर सवाल उपस्थित केले होते. पडळकर यांनी नुकतीच टीका करताना म्हटलं होतं की, जयंत पाटलांची मानसिकता खचल्यासारखी वाटते. सांगली जिल्हा आणि वाळवा तालुका कधीही झुकत (Maharashtra Politics) नाही, हे खरं असलं तरी जयंत पाटील झुकत नाहीत, तर थेट पालथे पडत आहेत. या जहरी वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं.

‘आंदोलन केवळ राजकीय आरक्षणासाठी…’ चंद्रकांत पाटलांची मनोज जरांगेंवर खोचक टीका

पडळकरांवर थेट हल्लाबोल…

आज त्यावर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील यांनी नाव न घेता पडळकरांना प्रत्युत्तर दिलं. त्यांनी ठाम शब्दात म्हटलं की, मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधात लढत नाही, हा माझा प्रश्नच नाही. मुद्दा वोट चोरीचा आहे. ज्या मतदारसंघात वोट चोरी झाली, तिथे राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढा. यासोबतच त्यांनी भाजपवर अप्रत्यक्ष टीका करताना म्हटलं की, देशात वाचाळवीरांची संख्या प्रचंड वाढली आहे. अशा वाचाळवीरांना स्वतःच्या पक्षात महत्त्व मिळत नाही. वरिष्ठांचे लक्ष वेधण्यासाठी ते सतत बडबड करत असतात.

जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?

मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधात लढत नाही, हा माझा प्रॉब्लेम आहे. पण मुद्दा वोट चोरीचा असून ज्या मतदारसंघात वोट चोरी झाली. तिथे राजीनामा द्या आणि परत एकदा निवडणूक लढवा, असं जयंत पाटील यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना आव्हान दिलंय. हिम्मत असेल तर जयंत पाटलांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा. मी त्यांच्या मतदारसंघात निवडणूक लढवायला तयार आहे, भाजपने ती मला संधी द्यावी…असं म्हणत आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांना आव्हान दिले होते. जयंत पाटलांनी महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षाला जाऊन भेटून राजीनामा द्यावा. माझी त्यांच्याच मतदारसंघात जाऊन लढायची तयारी आहे. पण जयंत पाटील यांच्यामध्ये ती हिंमत आहे का? हे त्यानी सांगावे, असे पडळकर म्हणाले होते.

शौचालय बंद, पाणी नाही; संयम सुटला तर रस्त्यावर…मराठा आंदोलक संतापले, प्रशासनाकडून छळ…

वाचाळवीरांची संख्या खूप वाढली

या टिकेला आमदार जयंत पाटील आता प्रत्युत्तर दिलंय. आज देशामध्ये वाचाळवीरांची संख्या खूप वाढली. कारण या वाचाळवीरांना कुठेच मार्केट भेटत नाही. त्यामुळे आपल्या पक्षातील वरिष्ठ आपल्याकडे कधी बघणार? पण त्यांनी बघावं, म्हणून हे वाचाळवीर सतत बडबड करत असतात. असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube