Maharashtra Politics : CM शिंदेंना धक्का! मंंत्री सामंतांचा भाऊ ठाकरे गटाच्या वाटेवर ?

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) सध्या राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. आमदारांच्या अपात्रता सुनावणीत मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह त्यांच्या गटातील आमदारांचं काय होणार या प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही. अशातच आता शिंदे गटाला धक्का देणारी बातमी आली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या जवळचे मानले जाणारे मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या भावाने व्हॉट्सअॅप ठेवलेल्या स्टेटसने […]

Uday Samant And Eknath Shinde

Uday Samant And Eknath Shinde

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) सध्या राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. आमदारांच्या अपात्रता सुनावणीत मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह त्यांच्या गटातील आमदारांचं काय होणार या प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही. अशातच आता शिंदे गटाला धक्का देणारी बातमी आली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या जवळचे मानले जाणारे मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या भावाने व्हॉट्सअॅप ठेवलेल्या स्टेटसने चर्चांना उधाण आलं आहे. किरण सामंत यांनी ठेवलेल्या स्टेटसने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना धक्का बसला आहे.

किरण सामंत यांनी त्यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसला मशाल चिन्ह आणि त्याखाली उद्धव बाळासाहेब ठाकरे असा उल्लेख करणारा फोटो ठेवला आहे. यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्य आहेत. किरण सामंत यांच्या मनात नेमकं काय चाललं, ते आता उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार का असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. असे प्रश्न उपस्थित होत आहेत त्यामागे कारणही आहे. किरण सामंत लोकसभेसाठी इच्छुक आहेत. परंतु, सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघ लढण्यासाठी भाजप आग्रही आहे. त्यामुळेच अस्वस्थ झालेल्या किरण सामंत यांनी धक्कातंत्राचे संकेत दिल्याचे बोलले जात आहे.

Sharad Pawar : ‘इंडिया’त धुसफूस? पवारांनी सांगितला डॅमेज कंट्रोलचा प्लॅन!

या प्रकारावर किरण सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी स्टेटस ठेवले होते. त्यामागे काही कारणे आहेत. यावर योग्य वेळी बोलेन. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहून मी ते स्टेटस मागे घेतले आहे. उदयच्या करिअरच्या दृष्टीकोनातूनही मी ते स्टेटस मागे घेतले. या स्टेटसवर जो भी होगा देखा जायेगा असं लिहीलं होते. सगळ्या गोष्टींना माझी तयारी होती, असे त्यांनी सांगितले.

किरण सामंत लोकसभेसाठी इच्छुक

किरण सामंत उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू आहेत. रत्नागिरी मतदारसंघात उदय सामंत चार वेळा निवडून आले आहेत. त्यांच्या विजयात किरण सामंत यांचा मोठा वाटा आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या राजकारणात ते सक्रिय आहेत. या मतदारसंघात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. ते स्वतः व्यावसायिक आहेत. आजपर्यंत त्यांनी कोणतेही घेतले नव्हते. मात्र, आता त्यांनी थेट विरोधी भूमिका घेतल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे.

Mulund Viral Video : तृप्ती देवरूखकरांकडून शिवतीर्थावर शर्मिला ठाकरेंची भेट; राज ठाकरेंचाही ट्विट करत पाठिंबा

Exit mobile version