Download App

..अजूनही वेळ गेलेली नाही; अजितदादांच्या आमदारांना रोहित पवारांची साद

Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट (NCP Crisis) पडल्यानंतर पक्षातील बहुतांश आमदार अजित पवार गटात सहभागी झाले. यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटातील नेते आणि आमदारांकडून अजूनही शरद पवार (Sharad Pawar) यांचे फोटो बॅनर्सवर लावले जात आहेत. अजित पवार गटाच्या नेत्यांनी सूचना दिल्यानंतरही स्थानिक पातळीवर फारसा फरक पडल्याचे दिसत नाही. आता याच मुद्द्यावर आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सूचक वक्तव्य केले आहे.

ज्या ठिकाणी अजित पवार गटाच्या सभा होतात तिथून शरद पवारांचा फोटो वापरणं बंद केलं आहे. पण, आमदारांना माहित आहे शरग पवार यांच्याशिवाय लोक आपल्याला मतदान करणार नाहीत. त्यामुळे आमदारांकडून स्थानिक पातळीवर पवार साहेबांचा फोटो लावला जात असावा. ज्यांना पदं मिळाली, ज्यांना मंत्रीपदं मिळाली, जे आज सत्तेत आहेत ते कदाचित पवार साहेबांना विसरले असतील मात्र अनेक आमदार अजूनही त्यांना विसरलेले नाहीत. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही, असे रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले.

दादा विरुद्ध दादा! अजित पवार-चंद्रकांत पाटील वादात अडकली पुण्यातील 400 कोटींची कामे

शरद पवार हेच पक्षाचे अध्यक्ष आहेत. आता अजित पवारांच्या निवडणूक आयोगावर विश्वास आहे. कारण आयोग त्यांच्या खिशात आहे. मात्र आमचा सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे. निकाल आमच्या बाजूने लागेल असेही रोहित पवार म्हणाले. आगामी काळातील पक्षाच्या वाटचालीवरही आमदार रोहित पवार यांनी भाष्य केले. लोकांना विश्वासात घेऊन आणि शरद पवारांच्या हिंमतीवर आम्ही आमचा लढा देऊ. आगामी निवडणुकीत भाजप आणि त्यांच्याबरोबर गेलेल्यांचा अहंकार आम्ही संपवू, असा रोखठोक इशारा आ. पवार (Rohit Pawar) यांनी दिला.

सभांनी राजकारणाचा पारा वाढला

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर नव्याने पक्षबांधणी करण्यासाठी शरद पवार (Sharad Pawar) मैदानात उतरले आहेत. राज्यात ठिकठिकाणी सभा घेत आहेत. त्यामुळे राज्यातील राजकारणाचा पारा चढला आहे. या सभांतून शरद पवार अजित पवार यांच्या गटातील नेत्यांसह राज्य सरकार, केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. या सभांना प्रत्युत्तर देण्यासाठी अजित पवार गटाकडूनही उत्तर सभांचे आयोजन केले जात आहे. त्यामुळे सभांतून जोरदार आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. 

Sanjay Raut : ..म्हणून मोदी सरकारला ‘इंडिया’ची भीती; राऊतांनी सांगूनच टाकलं

Tags

follow us