Sanjay Raut : ..म्हणून मोदी सरकारला ‘इंडिया’ची भीती; राऊतांनी सांगूनच टाकलं
Sanjay Raut : इंडिया विरुद्ध भारतचा (INDIA vs Bharat) वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. विरोधकांनी दिलेल्या इंडिया आघाडीला (INDIA Alliance) घाबरून आता मोदी सरकारने थेट देशाच्या नावातूनच ‘इंडिया’ शब्द काढून टाकण्याच्या हालचाली सरकारने सुरू केल्याचा आरोप विरोधी पक्षांचे नेते करत आहेत. आता या वादात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उडी घेतली आहे. या वादावर प्रतिक्रिया देत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
आम्ही इंडिया नाव दिल्याने देशाच्या नावाची भीती वाटतेय आता तुम्ही काय काय बदलणार आहात? भारत हाच इंडिया आहे. तुम्हाला नवा भारत बनवायचा आहे तर रिपब्लिक ऑफ भारत करा. या देशातील जनता हे मंजूर करणार नाही, अशा शब्दांत राऊत (Sanjay Raut) यांनी सरकारला फटकारले.
Sanjay Raut : ‘मोदींचा वाढदिवस की भाजपचा निरोप समारंभ?’ विशेष अधिवेशनावर राऊतांची खोचक टीका
इंडिया आघाडी स्थापन झाल्यापासूनच त्यांना ‘इंडिया’ या शब्दाची भीती वाटू लागली आहे. घटनेतील नावाविषयी भय वाटू लागते हा विचित्र प्रकार आहे. भारत, इंडिया हे घटनेतील नाव आहे. इंडियाचे नामोनिशान मिटवण्याचा डरपोकपणा, क्रूर, विकृतपणा आहे. रिपब्लिक ऑफ भारत करा, तुम्ही चांद्रयानात बसून काम करत आहात का, इंडिया आहे, इंडिया राहिल आणि सत्तेवर इंडिया येईल असा दावा राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेत केला.
वन नेशन वन इलेक्शन हा मोठा घोटाळाच
एक देश एक निवडणूक (One Nation One Election) हा एक मोठा घोटाळा आहे. या सरकारने मागील नऊ वर्षांच्या काळात घोटाळे केले. त्यातलाच हा एक घोटाळा आहे. देश लुटण्याचा आणि देशाला खड्ड्यात घालण्याचाच हा प्रकार आहे, अशी जहरी टीका राऊत (Sanjay Raut) यांनी केली. देशात महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी हे मुद्दे तसेच आहेत. इंडिया नाव बदलून लपवाछपवी चालणार नाही, असेही राऊत म्हणाले.
किरीट सोमय्या व्हायरल व्हिडीओ : लोकशाहीचे संपादक कमलेश सुतार यांच्यावर गुन्हा दाखल
विशेष अधिवेशनामागचा छुपा अजेंडा काय ?
तुम्ही संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलंय. तुम्ही तुमचा कार्यक्रम का लपवता?, एवढं देशात काय गोपनीच चाललंय?, ही कोणती हुकूमशाही आहे? संसदेच्या अधिवेशनाचा कार्यक्रम सांगितला जात नाही. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पेटलाय. याविषयी आवाज उठवायचा आहे. महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळ आहे, हे मुद्दे आम्ही मांडू शकतो की नाही, असाही सवाल राऊत (Sanjay Raut) यांनी उपस्थित केला.