किरीट सोमय्या व्हायरल व्हिडीओ : लोकशाहीचे संपादक कमलेश सुतार यांच्यावर गुन्हा दाखल
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रभरात खळबळ उडाली होती. यानंतर दुसऱ्या दिवशी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेही यांनी हा मुद्दा भर सभागृहात मांडत सोमय्यांवर गंभीर आरोप केले होते. त्यांनी धमकावून किंवा भीती दाखवून काही भगिनींचे शोषण केल्याचे आरोप करण्यात आले होते. यानंतर सरकारकडून यावर उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले होते. (A case has been registered against the editor of lokshahi news channel Kamlesh Sutar in the Kirit Somaiya viral video case)
मात्र आता ही चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच ही बातमी सर्वात आधी दाखविण्याऱ्या लोकशाही वृत्तवाहिनीचे संपादक कमलेश सुतार यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मंगळवारी पोलिसांनी सोमय्या यांचा जबाब नोंदविला होता. त्यानंतर रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत होती. मात्र आता तो तपास सायबर पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे.
Maratha Reservation : मोठी बातमी ! मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांचे पथक दाखल
याबाबत लेट्सअप मराठीशी बोलताना कमलेश सुतार म्हणाले, भारतीय दंड संहितेच्या कलम ५०० (मानहानी) आणि सायबर अॅक्टच्या दोन कलमांतर्गत हा गुन्हा दाखल झाला आहे. यातील दोन कलमे जामीनपात्र आणि एक कलम अजामीनपात्र आहेत. पण आम्ही हा व्हिडीओ दाखविण्यापूर्वी जवळपास 15 मिनिटे आमची भूमिका विशद केली होती. सोमय्या हे एक मोठे व्यक्ती आहेत आणि त्यांचाच अशाप्रकारे व्हिडीओ लीक होणे हे गंभीर होते.
‘चोर मंडळातील एक मोदी लंडनच्या पार्टीत’.. ठाकरे गटाची मोदी सरकारवर आगपाखड
त्यांचाच जर व्हिडीओ लीक होऊ शकतो तर अन्य महत्वाच्या व्यक्तींचा डाटा कितपत सुरक्षित आहे, असा मुद्दा आम्ही मांडला होता. यामागे कोणाच्याही खासगी आयुष्यात डोकावण्याचा हेतू नव्हता. चौकशीचे आदेश हे दानवे यांच्या आरोपांवर देण्यात आले होते. मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी तत्परता दाखवत आमच्यावर गुन्हे दाखल आहेत. पण तपासासाठी जे काही सहकार्य आवश्यक असेल ते करणार असल्याचेही सुतार यांनी स्पष्ट केले.