Download App

“शरद पवार गटातील अनेक जण आमच्या संपर्कात”; तटकरेंच्या दाव्याने खळबळ

शरद पवार गटातील अनेकजण आमच्या संपर्कात आहेत असा दावा अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत केला.

Sunil Tatkare Press Conference : लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर या पराभवाची (Sunil Tatkare) कारणं शोधण्यात अजित पवारांचा पक्ष गुंतला आहे. पराभव झाल्याचं मान्य करत आगामी निवडणुकीसाठी रणनीती ठरवण्यात येत आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हालचालींवर लक्ष ठेऊन त्यानुसार डावपेच टाकण्याचे प्रयत्न अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून होत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज खासदार सुनील तटकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लोकसभेत पक्षाचा पराभव का झाला याची कारणं सांगितली. तसेच शरद पवार गटातील नेत्यांवर घणाघाती टीका केली तसेच शरद पवार गटातील अनेकजण आमच्या संपर्कात आहेत असा दावा केला.

तटकरे पुढे म्हणाले, काही लोकांकडून आमच्या आमदारांबाबत जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात आहे. परंतु, तस काहीच नाही. आम्ही लवकरच राज्यव्यापी दौरा सुरू करणार आहोत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं सत्र संपल्यानंतर अजित पवारही राज्यव्यापी दौरा करणार आहेत . निवडणुकीत मतदानाची तारीख जवळ येत गेली तसं विरोधकांनी अजितदादांना जाणीवपूर्वक टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियातूनही त्यांना लक्ष्य केलं गेलं असा आरोप तटकरेंनी यावेळी केला.

जिथे शरद पवार गटाचा मेळावा त्याच नगरमधून तटकरेंचा दौरा; नव्या राजकारणाचं गणित काय?

शरद पवार गटात शीतयुद्ध नाही, उघड युद्ध

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापनदिन काल नगरमध्ये पार पडला. यावेळी भाषणावरून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पक्षातील काही नेत्यांचे वाद आहेत. राष्ट्रवादीत हे शीतयुद्ध नाही तर उघडउघड युद्ध आहे, असा खोचक टोला तटकरेंनी शरद पवार गटाला लगावला. जयंत पाटील मागील सहा वर्षांपासून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. परंतु, त्यांनाही मी सहा महिन्यात पद सोडणार आहे तेव्हा शांत बसा काही तक्रारी करू नका असं जाहीर भाषणातून सांगावं लागलं, याचा अर्थ काय असा सवाल तटकरेंनी यावेळी उपस्थित केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी राज्यसभेवर आपले तीन खासदार जातील असे विधान अजित पवार यांनी केले होते. उद्या राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर जाणाऱ्या तीन उमेदवारांची नावं जाहीर केली जातील अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली. यामध्ये सुनेत्रा पवार यांचं नाव असणार का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता त्यावर थेट उत्तर देणं तटकरेंनी टाळलं. उद्या आम्ही नावं जाहीर करू, इतेकच त्यांनी सांगितले. त्यामुळे आता उद्या राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची नावं जाहीर करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Modi 3.0 : PM मोदींचे मंत्रिमंडळ किती शिकलेले? जाणून घ्या, प्रत्येक मंत्र्याची शैक्षणिक पार्श्वभूमी

follow us

वेब स्टोरीज