जिथे शरद पवार गटाचा मेळावा त्याच नगरमधून तटकरेंचा दौरा; नव्या राजकारणाचं गणित काय?

जिथे शरद पवार गटाचा मेळावा त्याच नगरमधून तटकरेंचा दौरा; नव्या राजकारणाचं गणित काय?

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर या पराभवाची कारणं शोधण्यात अजित पवारांचा पक्ष गुंतला आहे. पराभव झाल्याचं मान्य करत आगामी निवडणुकीसाठी रणनीती ठरवण्यात येत आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हालचालींवर लक्ष ठेऊन त्यानुसार डावपेच टाकण्याचे प्रयत्न अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून होत आहेत. ज्या अहमदनगरमध्ये काल शरद पवार यांच्या उपस्थितीत वर्धापनदिन साजर करण्यात आला त्याच नगरमधून अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे 19 जूनपासून राज्यव्यापी दौरा सुरू करणार आहेत. येथे आढावा घेणार आहे. येथे दोन मतदारसंघ आहेत. येथील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहे, अशी माहिती तटकरे यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज खासदार सुनील तटकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लोकसभेत पक्षाचा पराभव का झाला याची कारणं सांगितली. तसेच शरद पवार गटातील नेत्यांवर घणाघाती टीका केली. तटकरे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत पराभव झाला हे मान्यच करावं लागेल. अनेक मतदारसंघात अल्पसंख्याक समाज आमच्यापासून दूर गेला. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचेही प्रश्न होते. काही मतदारसंघात तर अल्पसंख्याक समाजाची एकगठ्ठा मतं महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मिळाली त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला.

“लोकसभेला साथ दिली, पुढे तीन महिन्यांनीही द्या”, शरद पवारांची विधानसभेसाठी फिल्डिंग

तटकरे पुढे म्हणाले, काही लोकांकडून आमच्या आमदारांबाबत जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात आहे. परंतु, तस काहीच नाही. आम्ही लवकरच राज्यव्यापी दौरा सुरू करणार आहोत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं सत्र संपल्यानंतर अजित पवारही राज्यव्यापी दौरा करणार आहेत . निवडणुकीत मतदानाची तारीख जवळ येत गेली तसं विरोधकांनी अजितदादांना जाणीवपूर्वक टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियातूनही त्यांना लक्ष्य केलं गेलं असा आरोप तटकरेंनी यावेळी केला.

शरद पवार गटात शीतयुद्ध नाही, उघड युद्ध

दरम्यन, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापनदिन काल नगरमध्ये पार पडला. यावेळी भाषणावरून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पक्षातील काही नेत्यांचे वाद आहेत. राष्ट्रवादीत हे शीतयुद्ध नाही तर उघडउघड युद्ध आहे, असा खोचक टोला तटकरेंनी शरद पवार गटाला लगावला. जयंत पाटील मागील सहा वर्षांपासून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. परंतु, त्यांनाही मी सहा महिन्यात पद सोडणार आहे तेव्हा शांत बसा काही तक्रारी करू नका असं जाहीर भाषणातून सांगावं लागलं, याचा अर्थ काय असा सवाल तटकरेंनी यावेळी उपस्थित केला.

चार राज्यांचं भाजपाच्या मेहनतीवर पाणी.. दक्षिण अन् पूर्वेतला विजयही झाकोळला

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज