पराभवची जबाबदारी सर्वांचीच, दिल्लीत कोणतीही लाचारी पत्करली नाही…; तटकरे स्पष्टच बोलले

पराभवची जबाबदारी सर्वांचीच, दिल्लीत कोणतीही लाचारी पत्करली नाही…; तटकरे स्पष्टच बोलले

Sunil Tatkare : मोदींच्या मंत्रिमंडळात शिवसेनेला राज्यमंत्रीपद मिळालं. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वाट्याला एकही मंत्रीपद आलं नाही. त्यामुळं विरोधकांकडून अजित पवा (Ajit Pawar) गटावर दिल्लीत लाचारी पत्करल्याची टीका होतेय. त्यावर आता सुनील तटकरेंनी (Sunil Tatkare) जोरदार प्रत्युत्तर दिलं. दिल्लीत कोणतीच लाचारी पत्करली नाही आणि पत्करण्याचा प्रश्नच येत नाही, असं तटकरेंनी ठणकावलं.

Bigg Boss OTT 3 मध्ये अनिल कपूरची एंट्री! धमाकेदार प्रोमो आउट 

राष्ट्रवादी पक्षाचा आज 25 वा वर्धापन दिन आहे. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा वर्धापन दिन साजरा होत आहे. या मेळाव्यात बोलतांना तटकरे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला देश-विदेशातील बडे नेते उपस्थित होते. त्यावेळी अजित पवार पहिल्या रांगेत बसले होते. सुरुवातीला ते दुसऱ्या रांगेत बसले होते. मात्र, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी अजित पवारांना पुढे बोलावून घेतलं. त्यामुळे आम्ही दिल्लीत कोणतीच लाचारी पत्करली नाही, आणि पत्करण्याचा प्रश्नच येत नाही, असं तटकरे म्हणाले.

अजितदादांसाठी तटकरे पवारांना भिडले; भर कार्यक्रमात विचारला थेट प्रश्न 

पराभवाची जबाबदारी सर्वांचीच…
पुढं बोलतांना ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला केवळ एक जागा मिळाली, याची संपूर्ण जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली असून, ही त्यांची एकट्याची जबाबदारी नसून आपल्या सर्वांची आहे. हा पराभव एकट्या अजितदादांचा पराभव नसून राष्ट्रवादीच्या सर्वाचाच आहे, असं तटकरे म्हणाले.

अजितदादांना मंत्रीपद का नाकारलं?
यावेळी तटकरे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. तुम्हाला मंत्रिपदाचा सात वर्षाचा अनुभव होता. त्यामुळं तुम्ही मुख्यमंत्री झाला. मग 2004 साली अजित पवारांनाही सात वर्षाचा मंत्रिपदाचा अनुभव होता. तरीही अजित पवारांना मुख्यमंत्रीपद का नाकारलं?, असा सवाल तटकरेंनी केला.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज