Bigg Boss OTT 3 मध्ये अनिल कपूरची एंट्री! धमाकेदार प्रोमो आउट

Bigg Boss OTT 3 मध्ये अनिल कपूरची एंट्री! धमाकेदार प्रोमो आउट

Bigg Boss OTT 3 : पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला रिॲलिटी शो बिग बॉस ओटीटी 3 (Bigg Boss OTT 3) येत आहे. नुकतंच या शो चा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. ज्याला चाहत्यांकडून जबरदस्त रिस्पॉन्स देखील मिळत आहे. यावेळी बिग बॉस ओटीटीचा होस्ट बदलला असून सलमान खानच्या (Salman Khan) जागी या शो ला आता अनिल कपूर (Anil Kapoor) होस्ट करणार आहे.

नवीन प्रेमोमध्ये देखील बिग बॉस ओटीटी 3 च नवीन होस्ट म्हणून अनिल कपूरची ओळख करून देण्यात आली आहे. याच बरोबर गेल्या सीझनपेक्षा जास्त धमाल या सीझनमध्ये पाहायला मिळणार असं प्रोमोमध्ये दिसून येत आहे.

बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता अनिल कपूर त्याच्या खास शैलीने घरात धमाल करणार याची खात्री या नवीन प्रोमोने दिली आहे. यामुळेच प्रेक्षकांना या शो बद्दल खूप उत्सुकता असून आता नवीन काय होणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.

बिग बॉस ओटीटीचे मागील सीझन सलमान खान यांनी होस्ट केले होते तर आता हा बिग बॉस ओटीटी 3 अनिल कपूर होस्ट करणार आहे. यामुळे तो स्पर्धकांना कसं हॅण्डल करणार हे बघण्यासाठी चाहत्यांना थोडी वाट बघावी लागणार आहे. बिग बॉस ओटीटी 3 ची सुरुवात 21 जूनपासून OTT वर होणार आहे.

तर दुसरीकडे अनिल कपूर बिग बॉस ओटीटी 3 पूर्वी ‘ॲनिमल’, ‘फाइटर’ आणि ‘क्रू’ या सारख्या सुपरहिट चित्रपटामध्ये काम केले आहे तर आता तो सुरेश त्रिवेणींच्या ‘सुभेदार’ या चित्रपटात काम करण्याच्या तयारीत आहे.

धक्कादायक! अभिनेत्री नूर मलाबिका दासचा मृत्यू, पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

याच बरोबर तो YRF स्पाय युनिव्हर्समध्ये देखील दिसणार असल्याची चर्चा सध्या बॉलीवूडमध्ये जोरात होत आहे मात्र याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

सिद्धार्थ जाधव चमकला! ‘या’ चित्रपटासाठी मिळाला बेस्ट अ‍ॅक्टर अवॉर्ड! चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज