धक्कादायक! अभिनेत्री नूर मलाबिका दासचा मृत्यू, पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

धक्कादायक! अभिनेत्री नूर मलाबिका दासचा मृत्यू, पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Noor Malabika Das : बॉलीवूडमधून (Bollywood) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार लोकप्रिय अभिनेत्री आणि कतार एअरवेजची माजी एअर होस्टेस नूर मलाबिका दास (Noor Malabika Das) याचे निधन झाले आहे. नूरने द ट्रायल (The Trial) या वेब सीरिजमध्ये काजोलसोबत (Kajol) काम केले होते. नूरने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नूरने 6 जूनच्या आसपास लोखंडवाला (Lokhandwala) येथील घरात आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लोखंडवाला येथील घरात अभिनेत्रीचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरु केला असून तिने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समोर आलेला नाही.

माहितीनुसार, अभिनेत्री नूरच्या शेजारी राहणाऱ्या लोकांना तिच्या घरातून दुर्गंधी येत असल्याने त्यांनी ओशिवरा पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर पोलिसांनी अभिनेत्रीच्या घराचा दरवाजा तोडून फ्लॅटमध्ये जाऊन तपासणी केली असता पोलिसांना नूरचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. यानंतर पोलिसांनी नूरच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र कोणीही पुढे आले नाही यामुळे पोलिसांनी बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या एनजीओच्या (NGO) मदतीने रविवारी नूरचे अंतिम संस्कार केले.

आम्ही अभिनेत्री नूरच्या कुटुंबियांशी संवाद साधला. ते एका आठवड्यापूर्वीच मुंबईतून गावी गेले होते त्यामुळे हे त्यांच्यासाठी देखील धक्कादायक आहे . या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरु केला आहे अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

37 वर्षीय अभिनेत्री नूर मलाबिका दास आसामची रहिवासी होती. तिने बॉलीवूडमधील अनेक चित्रपटामध्ये आणि वेब सिरीजमध्ये काम केले आहे. तिने सिसाकियां, वॉकमन, मसालेदार चटणी, प्यूबिक रेमेडी, ऑर्गॅझम, देखी उंडेखी, बॅकरोड हस्टल`या सारख्या चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये काम केले आहे.

सिद्धार्थ जाधव चमकला! ‘या’ चित्रपटासाठी मिळाला बेस्ट अ‍ॅक्टर अवॉर्ड! चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

याच बरोबर ती सोशल मीडियावर देखील सक्रिय होती. तिने पाच दिवसांपूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता ज्याला चाहत्यांकडून जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला होता.

अमृता खानविलकर छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार, ‘या’ कार्यक्रमात ‘जज’ च्या भूमिकेत दिसणार

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज