Prerna Arora: बॉलीवूडमधील लैंगिक असमानतेवर निर्माती प्रेरणा अरोरा पहिल्यांदाच बोलली; म्हणाली…
Prerna Arora : अभिनेत्री प्रेरणा अरोरा (Prerna Arora ) तिच्या ट्रेलब्लॅझिंग कथाकथनासाठी आणि प्रभावशाली सिनेमॅटिक कामासाठी ओळखली जाते. (social media) आता ती तिच्या ओटीटी (OTT) स्पेसमध्ये काम करण्यासाठी सज्ज होताना दिसणार आहे. भारतीय चित्रपट उद्योगासारख्या पुरुषप्रधान क्षेत्रात फार कमी महिलांना स्वत:साठी एक वेगळं आणि तितकच खास स्थान मिळवता आला आहे.
View this post on Instagram
आजही अनेकांना महिलांच्या नेतृत्वाखालील चित्रपटाची पाठराखण करावी लागली असून गेल्या काही वर्षांत अनेक महिलांनी त्यांना हव्या त्या कथा सांगण्यास आणि सक्षम होण्यासाठी चित्रपट निर्मितीचा व्यवसाय स्वीकारला आहे. क्रिती सॅनन, आलिया भट्ट आणि इतरांसारख्या अभिनेत्रींनी त्यांना ज्या प्रकारचा कंटेंट बनवायला आवडेल, अशा प्रकारची निर्मिती करण्यास सुरुवात केली. या इंडस्ट्रीत मोठा बदल होत आहे आणि यांच्या प्रवासात प्रेरणा अरोरा, एकता कपूर, रिया कपूर, गुनीत मोंगा आणि इतरांसारख्या चित्रपट निर्मात्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
प्रेरणा याबद्दल बोलताना म्हणाली की, ‘आम्ही खूप पुढे आलो आहोत पण आजही नायकांच्या नेतृत्वाखालील मोठ्या बजेटच्या चित्रपटांच्या तुलनेत महिलांच्या नेतृत्वाखालील चित्रपटांना तितकं महत्त्वपूर्ण स्थान दिलं जात नाही. असमान वागणूक मिळत आहे. एक काळ असा होता. चित्रपटाच्या सेटवर एकही महिला नसायची आज कमीत कमी 30-50 टक्के स्त्रिया त्यांच्या कथा सांगत असल्याचे दिसत आहेत. लिंग समानता आणि त्याबाबतच्या तिच्या अनुभवाबद्दल बोलताना प्रेरणा सांगते “पाहा ‘क्रू’ने कसा पल्ला गाठला ! खूप लांबचा पल्ला गाठायचा असला तरी आम्ही अर्ध्या वाटेवर पोहोचलो आहोत, असे अभिनेत्रीने यावेळी सांगितले आहे.
Prerna Arora: …म्हणून अभिनेत्री प्रेरणा अरोरा पहिली भारतीय निर्माती बनली
प्रेरणा अरोरा निर्माती म्हणून तिचा प्रवास सुरू केल्यापासूनच आउट-ऑफ-द-बॉक्स प्रोजेक्ट्स घेऊन आली आहे. तिच्या फिल्मोग्राफीमध्ये ‘पॅडमॅन’, ‘परी’, ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’ आणि ‘रुस्तम’ सारख्या काही चित्रपटांचा समावेश आहे. आता ती तिचे दोन चित्रपट ‘हिरो हिरोईन’ आणि ‘डंक: वन्स बिटन ट्वीस शाई’च्या रिलीजच्या प्रतीक्षेत आहे जे लवकरच चित्रपटगृहात दाखल होणार आहेत.
इंडस्ट्रीत बदल घडवून आणण्यात अरोराचे योगदान तिच्या आगामी ‘हीरो हिरोईन’ या चित्रपटाद्वारे सुरू आहे. ‘हीरो हिरोईन’ हा संपूर्ण भारतातील प्रकल्प असून दिव्या खोसला मुख्य भूमिकेत आहे, तर तुषार कपूर, सुचित्रा कृष्णमूर्ती आणि इतर प्रमुख भूमिकेत आहेत.