Bigg Boss OTT 3: ‘बिग बॉस ओटीटी 3’चा नवीन होस्ट अनिल कपूरचा फर्स्ट लूक रिलीज

Bigg Boss OTT 3: ‘बिग बॉस ओटीटी 3’चा नवीन होस्ट अनिल कपूरचा फर्स्ट लूक रिलीज

Anil Kapoor Bigg Boss OTT 3 First Look : बिग बॉस ओटीटीचा (Bigg Boss OTT 3) तिसरा सीझन पाहण्यासाठी चाहते बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. आता बिग बॉसच्या चाहत्यांना आनंदाची बातमी मिळणार आहे.’बिग बॉस ओटीटी सीझन 3′ च्या प्रीमियरची तारीख समोर आली आहे. अनिल कपूरचा (Anil Kapoor) हा शो 21 जूनपासून ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म जिओ सिनेमावर सुरू होत आहे. बिग बॉस ओटीटी तिसऱ्या सीझनसह परतण्यासाठी सज्ज आहे आणि यावेळी अनिल कपूर हा शो होस्ट करणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by JioCinema (@officialjiocinema)


बिग बॉस OTT 3 च्या रिलीजची तारीख जाहीर

‘बिग बॉस ओटीटी 3’ तुम्हाला 24×7 पाहू शकणार आहात. यावेळी शोमध्ये जाण्यासाठी अनेक सेलिब्रिटींची नावे पुढे येत आहेत. अलीकडेच, निर्मात्यांनी जिओ सिनेमाच्या इन्स्टा हँडलवर शो संबंधित एक नवीन पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत असताना कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, मोठ्या पडद्यावर राज्य करण्यापासून ते आता ‘बिग बॉस’च्या घरात राज्य करण्यापर्यंत अनिल कपूर खास आहे. 21 जूनपासून जिओ सिनेमावर सुरू होणाऱ्या ‘बिग बॉस OTT 3’ मध्ये त्याची जादू पहा. शोच्या प्रीमियरची तारीख पाहून चाहते खूप उत्साहित झाले आहेत.

अनिल कपूर म्हणाला…

अनिल कपूरनेही या शोबद्दल उत्साह व्यक्त केला आणि म्हणाला, ‘बिग बॉस ओटीटी आणि मी एक ड्रीम टीम आहोत. आम्ही दोघेही मनाने तरुण आहोत, लोक अनेकदा विनोद करतात की मी रिव्हर्स एजिंग आहे, पण बिग बॉसमध्ये ही गुणवत्ता आहे. असे वाटते की शाळेत परत जावे, काहीतरी नवीन आणि मजेदार करण्याचा प्रयत्न करा. तीच ऊर्जा मी बिग बॉसमध्ये 10 पट अधिक घेऊन येणार आहे. मी स्वत:ला सिध्द करून दाखवणार आहे.

या सेलिब्रिटींना शोमध्ये पाहता येणार

या शोमध्ये जाणाऱ्या अनेक स्पर्धकांची नावे समोर येत आहेत. ज्यामध्ये रियाझ अली, शिवांगी जोशी, शफाक नाज, दलजीत कौर, व्हायरल वडापाव गर्ल चंद्रिका, यूट्यूबर झैन सैफी, विकी जैन आणि अदनान शेख यांचा समावेश आहे. याशिवाय क्रिती सेनॉनची बहीण नुपूर सेनन त्रिशला दत्त, अहाना देओल, मिथुन चक्रवर्तीचा मुलगा उष्मय चक्रवर्ती आणि ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम भव्या गांधी यांच्या नावाचीही चर्चा आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

Anil Kapoor : फ्लाइटमध्ये चाहत्यांनी केला अनिल कपूरवर प्रेमाचा वर्षाव, फोटो व्हायरल

‘बिग बॉस ओटीटी’ सीझन 3 ची संकल्पना वेगळी असणार

या शोच्या संकल्पनेबद्दल सांगितले जात आहे की, यावेळचा शो पूर्वीपेक्षा खूपच वेगळा असेल. यावेळी ‘बिग बॉस OTT 3’ मधील बनावट फॅन फॉलोइंगवर नियंत्रण ठेवण्यासाठी सबस्क्रिप्शन योजना आणण्यात आली आहे. यासह, स्पर्धकांसाठी पीआर समर्थन समाप्त झाले आहे. काळासोबत शोमध्ये आणखी सस्पेन्स पाहायला मिळेल. हा संपूर्ण प्लान सलमान खानने तयार केल्याचे बोलले जात आहे आणि त्यानेच होस्ट म्हणून अनिल कपूरचे नाव सुचवले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज