Download App

‘साहेब, बडव्यांना बाजूला करा, आम्हाला आशिर्वाद द्यायला या’; भुजबळांची आर्त साद!

Chagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षातील वातावरण ढवळून निघालेले असतानाच राष्ट्रवादीतील दोन्ही गटांच्या बैठका आज होत आहेत. या बैठकांनी राजकारणाचा पारा चांगलाच चढला आहे. अजित पवार यांच्या गटाची बैठक सुरू झाली असून या बैठकीत ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत राजकारणावर जोरदार प्रहार केले. तसेच पक्षातून बाजूला होऊन शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा का दिला याचही उत्तर दिले.

भुजबळ म्हणाले, पवार साहेब आमच्यासाठी विठ्ठल असून, त्यांना बडव्यांनी घेरले आहे. घेरलेल्या बडव्यांना बाजूला सारत साहेबांनी आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी याव अशी आर्त विनवणीदेखील भुजबळांनी यावेळी केली. भुजबळांच्या या वक्तव्याचा रोख जयंत पाटील यांच्याकडे असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

एमईटी येथील बैठकीची प्रस्तावना करताना छगन भुजबळ यांनी अनेक गोष्टींवर भाष्य करत गौप्यस्फोट केले आहेत. ते म्हणाले की, या सगळ्या गोष्टी अचानक झाल्या नाहीत; बऱ्याच महिन्यांपासून ही प्रक्रिया सुरु होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अभ्यास करूनच हे पाऊल उचलल्याचं भुजबळांनी यावेळी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरे यांची नियुक्ती केल्यामुळे ओबीसी समाजात आनंदाची भावना असल्याचेही ते म्हणाले.

तासगावचा पुढचा आमदार ठरला! आर.आर. पाटलांच्या लेकानं गाजवलं शरद पवारांचं व्यासपीठ

अजित पवार यांच्यासोबत ४० पेक्षा जास्त आमदार आहेत. त्यांच्या प्रतिज्ञापत्रावर सह्या झाल्या आहेत. बुधवारी बैठकीला सर्व आमदार आले नाही. कारण काही विदेशात आहेत. काही आजारी आहेत तर काही वाहतूक कोंडीत अडकले आहेत, असा दावा छगन भुजबळ यांनी केला.

ते पुढे म्हणाले, 1999 साली आम्ही काँग्रेस सोडली. राष्ट्रवादी स्थापन केली त्यानंतर परत काँग्रेस सोबत गेलो. मंत्रिमंडळात सामील झालो. त्यानंतर मात्र असं काय झालं. आम्ही एकत्रित निवडणुका लढत होतो. पण, 2014 साली वेगळे लढण्याचं कारण काय हे कळंल तर बीजेपीने शिवसेना सोडली म्हणून इकडे राष्ट्रवादीने काँग्रेस सोडला पण, का याचं उत्तर काही मिळालं नाही. अचानक असे निर्णय कसे होतात असा सवाल भुजबळ यांनी केला.

गुगली टाकून आपल्याच गड्याला आऊट करायचं का ?

2019 चा सकाळचा शपथविधी का झाला. त्याच्या पाठीमागे कोण होते. साहेब म्हणतात गुगली टाकली. पण गुगली टाकून आपल्याच गड्याला आऊट करायचं का? असा सवाल करत याचं त्याचं उत्तर दादाच देतील, असे भुजबळ म्हणाले.

साहेब, आमचाही सत्कार करायला या 

2019 निवडणुकीआधी आणि नंतर काय बोलणी झाली. अजितदादा उठले आणि तिकडे गेले हे असं का झालं. आपण दिल्लीत चर्चा करायची. काही दिवसांनंतर माघार घ्यायची नेत्यांना तोंडघशी पाडायचे काही कळत नाही. ते म्हणतात आम्ही भाजपबरोबर गेलो. पण आम्ही जसे शिवसेनेबरोबर गेलो तसे भाजपबरोबर गेलो त्यात नवीन काय. आम्ही भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. नागालँडमध्ये सरकारमध्ये ज्या पद्धतीने राष्ट्रवादीचे आमदार सामील झाले मग आम्ही सामील झालो तर काय बिघडलं. त्या आमदारांच जसा तुम्ही सत्कार केला तसा आमचाही करा, असे भुजबळ म्हणाले.

Tags

follow us