Download App

शिंदेंच्या राजीनाम्याच्या बातम्यांवर गोगावलेंचा संताप; म्हणाले, अशा बातम्यांना आम्ही..

Maharashtra Politics : राज्यातील सत्तासंघर्षावर न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असली तरी निकाल येणे बाकी आहे. त्यामुळे आमदार अपात्र ठरणार का, राज्य सरकार कोसळणार का, असे प्रश्न सातत्याने चर्चिले जात आहेत. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांचीही भर पडली आहे. एका गुजराती भाषेतील वृत्तपत्रात तर एकनाथ शिंदे यांनी राजीनामा तयार ठेवावा, अशा सूचना केंद्राने दिल्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे.

या प्रकारावर आता शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा तयार ठेवावा असे निर्देश केंद्र सरकारने दिल्याची बातमी एका गुजराती वर्तमान पत्रात आल्याबाबत पत्रकारांनी गोगावले यांना विचारले.

Sanjay Shirsat : केवळ मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांची बदनामी करणं हा राऊतांचा उद्देश

त्यावर गोगावले म्हणाले, त्या पेपरला काय स्वप्न पडले आहे का ?, अशा कोणत्याही बातम्यांना सामोरे जाण्यासाठी आम्ही नेहमीच तयार असतो. शिंदे साहेब हे शिंदे साहेब आहेत ते कुणी दुसरे नाहीत. अशा बातम्या नेहमीच कुणी ना कुणीतरी देत असते त्यातीलच ही एक बातमी आहे. तुम्हाला पुढे काय ते कळेलच, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.

दरम्यान, त्यांनी संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, राऊतांनी खारघर दुर्घटनेतील मृतांचा आकडा सांगितला. उष्माघाताने मृत्यूमुखी पडलेल्यांचा त्यांनी दिलेला आकडा सिद्ध झाला तर जे बोलतील ते ऐकू, पण सिद्ध नाही झाला तर हे उलट्या पायानं चालायला तयार आहेत का ? असा सवाल त्यांनी केला.

राऊतांविरोधात तक्रार केल्याने काही फरक पडणार आहे का असे त्यांना विचारले असता ते म्हणाले तसे काही घडणार नाही पण निदान आम्ही त्यांना येथून पुढे अशी वक्तव्ये करण्यापासून तरी थांबवू शकतो, असे उत्तर गोगावले यांनी दिले.

Tags

follow us