उद्धव ठाकरेंकडे राहिलेत चार कुत्रे त्यापैकी तू.. चिडलेल्या राणेंची जाधवांवर जहरी टीका

मुंबई : ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव आणि राणे यांच्यात शाब्दिक युद्ध चांगलेच रंगले आहे.जाधव यांनी एका सभेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. त्यावर आता माजी खासदार निलेश राणे यांनी जाधव यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. निलेश राणे (Nilesh Rane) यांनी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल केली आहे. त्यात ते म्हणतात, की भास्कर […]

Nilesh Rane : पुण्यात निलेश राणेंच्या मालमत्तेवर पालिकेची कारवाई...

Nilesh Rane : पुण्यात निलेश राणेंच्या मालमत्तेवर पालिकेची कारवाई...

मुंबई : ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव आणि राणे यांच्यात शाब्दिक युद्ध चांगलेच रंगले आहे.जाधव यांनी एका सभेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. त्यावर आता माजी खासदार निलेश राणे यांनी जाधव यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. निलेश राणे (Nilesh Rane) यांनी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल केली आहे. त्यात ते म्हणतात, की भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) तुझ्यासारखा फालतू आणि फडतूस माणूस जगात दुसरा नसेल. उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) लोकच कळली नाहीत म्हणून तुझ्यासारखी माणसे त्यांनी आजूबाजूला भरून ठेवली आहेत. उद्धव ठाकरेंकडे आता राहिलेत चार कुत्रे त्यापैकी तू एक आहेस,अशा शब्दांत राणे यांनी आखपाखड केली.

वाचा : Mohit Kamboj : आईचे दूध प्यायला असेल तर भास्कर जाधवांना पुन्हा डिवचले 

ते पुढे म्हणाले, की तुझी औकात आणि तुझी लायकीच नाही कुणाबद्दल बोलण्याची. तुला कोणी विचारतही नाही तरी स्वतःचे महत्व निर्माण करण्याचा तुझा प्रयत्न सुरू आहे. उद्धव ठाकरेंकडे राहिलेत चार कुत्रे त्यापैकी तू एक आहेस. आणि भाषणातही तू कबूल केले आहेस असे प्रत्युत्तर राणे यांनी या व्हिडिओद्वारे दिले आहे.

2 मार्चला कळेल बाई कोणाला पाडते; नितेश राणेंचा अजित पवारांना टोला

दरम्यान, राज्य सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनात उपस्थित राहण्यासाठी शिंदे गटाने शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हीप बजावला. त्यावरुन भास्कर जाधव कमालीचे आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. अशा व्हिपना आम्ही आजिबात भीक घालत नसल्याचे ते म्हणाले.

https://www.youtube.com/watch?v=fF8gDejsOa8

 

Exit mobile version