Download App

.. म्हणून आम्ही उद्धव ठाकरेंना भाजपाच्या मदतीने धडा शिकवला; शिरसाटांनी सांगितला ‘तो’ किस्सा

Sanjay Shirsat Criticized Uddhav Thackeray : राज्यात शिंदे गटाने भाजपाच्या मदतीने सरकार स्थापन केले. या घटनेला आता एक वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र, राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) अजूनही या घटनेचे पडसाद उमटत आहेत. या मुद्द्यावर आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी पुन्हा प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. शिरसाट यांनी आज पत्रकार परिषदेत संजय राऊत (Sanjay Raut), उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.

शिरसाट म्हणाले, राष्ट्रवादीने गुगली टाकली की तुम्हीच पाच वर्षे मुख्यमंत्री मग काय त्यांनी (उद्धव ठाकरे) हिंदूत्व बाजूला सारून, बाळासाहेबांचा विचार बाजूला सारून आपण मुख्यमंत्री होतोय ना मग बस. त्यांनी मागण्या मान्य केल्या आणि मुख्यमंत्री बनले. भाजपबरोबर जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसही तयार होती. मी स्वतः साक्षीदार आहे. गिरीश महाजन सारखे फोन करत होते. एकनाथ शिंदे यांनी देखील उद्धव ठाकरेंना सांगत होते की आपण बोलणी करू पण, मी जाणार नाही तू जा, असे ठाकरे म्हणाले होते. ही भाषा युती तोडण्यासाठी पुरेशी होती. त्यामुळे आम्ही मग शिवसेनाप्रमुखांचा विचार घेऊन आम्ही त्यांना धडा शिकवला आणि यात भाजपने आम्हाला साथ दिली हे नाकारून चालणार नाही.

भ्रष्टाचारी, गुन्हेगारांना गृहमंत्र्यांकडून अभय? राऊतांनी थेट दिले ‘हे’ चॅलेंज!

दारोदार भीक मागण्याची वेळ राऊतांनी आणली

संजय राऊत काहीही बोलू शकतात. राऊत हा ठाकरेंना जेवढं बुडवायचे तेवढं बुडवत आहे. यांना इतराच्या आनंदात पेढे वाटण्यात त्यांचा आनंद असल्याचे वाटते. या अशाच कारनाम्यांमुळे ठाकरे गटाला असे दिवस आले आहेत. उद्धव ठाकरेंना राजकारणात इतकं लाचार या संजय राऊतने केलंय हे पाहताना सुद्धा आम्हाला त्रास होत आहे. आता दारोदारी भीक मागण्याची वेळ आलीय ती याच संजय राऊतमुळे आली आहे. उद्या हाच संजय राऊत सिल्व्हर ओकच्या बाजूलाच आपले कार्यालय असले पाहिजे असे सांगायलाही कमी करणार नाही.

अध्यक्षही फेरउजळणीच करणार 

संजय राऊतला सुप्रीम कोर्टावरही विश्वास नव्हता. पण आता त्यांचा नाईलाज झाला आहे कारण कोर्टाने निकाल दिला आहे. झिरवळ जे बोलले त्यावर ते काहीच बोलणार नाहीत. झिरवळचे वक्तव्य कोणत्या कायद्यात बसते. त्यांना आता माहित आहे की आपला पराभव होणार आहे. कोर्टाने निकाल दिला आहे आता अध्यक्षांकडे आल्यावर त्याचीच फेरउजळणी होणार आहे.

कर्नाटकच्या निवडणुकीत कॉंग्रेसची बाजी, राज ठाकरे म्हणाले; हा ‘त्यांचा’ पराभव…

गडाखांना मंत्री का केले, उत्तर मिळालेच नाही

गडाखांना मंत्री का केले याचं उत्तर मला आजही मिळालेलं नाही. तुम्हाला बहुमताला आकडा कमी पडत होता का नाही, अपक्षाची गरज होती का नाही. मग असा कोणता चमत्कार घडला की तुम्हाला शंकरराव गडाख या अपक्षांना कॅबिनेट मंत्री करावे लागले, असा सवाल शिरसाट यांनी यावेळी केला.

 

Tags

follow us