Download App

Maharashtra Politics : शिंदे गटाचा आणखी एक विजय, संसदेतील शिवसेना कार्यालय एकनाथ शिंदेंच्या ताब्यात

नवी दिल्ली : शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह अधिकृतपणे शिंदे गटाकडे आले आहे. त्यानंतर आता शिंदे गटाकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. मुंबईतील विधीमंडळातील शिवसेना (Shiv Sena) पक्ष कार्यालय ताब्यात घेतल्यानंतर आता संसदेतील शिवसेना कार्यालयही (Shiv Sena office) शिंदे गटाकडे (Shinde group) आलं आहे.  उपसचिव सुनंदा चॅटर्जी यांनी माहिती देण्यात आली.

विधानसभेपाठोपाठ आता संसदेतील शिवसेना कार्यालयही (Shiv Sena office) एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) ताब्यात आलं आहे. लोकसभा सचिवालयाच्या उपसचिवांकडून अधिकृत पत्र जारी करत शिंदे शिवसेनेला कार्यालय देण्यात आलं आहे.

निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे दोन्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्यात आले. यानंतर आता शिंदे गटाने आता आपला मोर्चा शिवसेना कार्यालयाकडे वळवला होता. त्यानुसार आज विधीमंडळातील शिवसेना कार्यालयावर शिंदे गटाने ताबा मिळवला आहे. त्यानंतर शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्यासह इतर आमदार शिवसेना कार्यालयात प्रवेश केला आहे.

पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर आता शिंदे गट टप्प्याटप्प्याने महाराष्ट्रातील शिवसेनेच्या शाखा ताब्यात घेऊ शकते. याचा प्रयत्नही दापोली आणि नेरुळमध्ये करण्यात आला. यावेळी शिंदे गट व ठाकरे गटात राडा झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे येत्या काही दिवसांत दोन्ही गटात संघर्ष अधिक तीव्र होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

Tags

follow us