Download App

पालकमंत्रिपदावरून रस्सीखेच ! रायगड, बीडसह आणखी तीन जिल्हे डोकेदुखी ठरणार

महायुतीत पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू असल्याने महायुतीत सर्वकाही आलबेल नसल्याचं बोललं जात आहे.

  • Written By: Last Updated:

प्रशांत गोडसे 

(लेट्सअप प्रतिनिधी)

मुंबई : नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी फडणवीस सरकारचा खातेवाट (Cabinate allocation) जाहीर झाला. काही महत्त्वाची खाती भाजपकडून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेला तर काही खाती शिवसेनेकडून भाजपला देण्यात आली. विशेष म्हणजे खातेवाटपात भाजपचा (BJP) आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचावर चष्मा पाहायला मिळाला. आपल्याकडी अर्थ खाते आणि शिवसेनेकडील उत्पादन शुल्क खातेही अजित पवार स्वतःकडे ठेवण्यात यशस्वी झाले. मात्र, आता खरी कसरत असणार आहे ती पालकमंत्री पदावरून. त्यामुळे महायुतीत पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू असल्याने महायुतीत सर्वकाही आलबेल नसल्याचं बोललं जात आहे.

CM फडणविसांचा अहिल्यानगर दौरा; आण्णा हजारेंच्या हस्ते स्वागत, पोपटराव पवारांच्या मुलाच्या विवाह समारंभास भेट 

रायगडच्या पालकमंत्रीपदावरून धुसफूस
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून यापूर्वी सुद्धा अनेक वाद निर्माण झाले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे अदिती तटकरे यांच्याकडे होतं. तेव्हा शिवसेना आमदार भरत गोगावले, महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी यांनी तटकरे विरोधात भूमिका घेतली होती. त्यानंतर महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर उदय सामंत यांच्याकडे रायगडचं पालकमंत्रीपद सोपवण्यात आलं. आता महायुतीत अजित पवार यांचा समावेश असल्याकारणाने रायगडच्या पालकमंत्रीपदावरून पुन्हा रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यातच भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्री पदावर दावा केला असल्याने हा पेच सोडवायला मुख्यमंत्र्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

दादांना निर्घृण हत्या करणार्‍यांना पाठीशी घालण्याचा घाणेरडा डाग…; संतोष देशमुख हत्येप्रकरणी किरण मानेंची पोस्ट 

यंदाच्या मंत्रिमंडळ विस्तारात अदिती तटकरे यांच्याकडे महिला व बालकल्याण हे खातं कायम ठेवण्यात आलं असून भरत गोगावले यांना रोजगार हमी, फलोत्पादन, खारपाणपट्टा विकास हे खात देण्यात आलं आहे.

बीडच्या पालकमंत्रीपदावर मुंडेंचा दावा
विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत भेटून सुद्धा मुख्यमंत्रीपदापासून खाते वाटपापर्यंत जवळपास महिन्याभराचा कालावधी गेला. तरी आता पालकमंत्री पदावरून महायुतीत रस्सीखेच सुरू झाली आहे. बीडमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोन्ही भावा बहिणींनी मंत्रिपद आपल्याकडे घेतल्यानंतर आता पालकमंत्री पदासाठी आग्रहाची भूमिका घेतली आहे. पंकजा मुंडे यांचा मागच्या विधानसभा आणि त्यानंतर झालेल्या आताच्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. परंतु भाजपाकडून विधान परिषदेवर त्यांची वर्णी लावण्यात आल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तारात त्यांच्याकडे पर्यावरण आणि हवामान बदल, पशुसंवर्धन खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तर शिंदे सरकार मध्ये कृषिमंत्र्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तरीही बीडच्या पालकमंत्रीपदासाठी या दोन्ही नेत्यांकडून परस्पर दावा केला जात आहे.

संभाजीनगरचे पालकमंत्री कोण होणार?
शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजी नगरच्या पालकमंत्री पदावर दावा केला आहे. या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की, मागील ४० वर्षापासून मी शिवसेनेचं काम करत आलो आहे. त्या कामाचं, कष्टाचं फळं मला मिळालं आहे. मंत्रीपदाची ही संधी मला लोकांची सेवा करण्यासाठी मिळाली असून सामाजिक न्याय या खात्याचं मंत्रीपद मला मिळालं असल्याकारणाने मी फार आनंदीत आहे. यासोबत छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री मीच होणार असून या संदर्भातील फक्त औपचारिक घोषणा बाकी असल्याचंही संजय शिरसाट म्हणाले आहेत.

तर दुसरीकडे भाजपचे नेते, ओबीसी कल्याण, दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी सुद्धा छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदावर दावा केला असल्याने पालकमंत्रीपद नेमकं कोणाला मिळते, हेच पाहणं महत्वाचं आहे.

साताराऱ्याच्या पालकमंत्रिपदावरून तिढा…

महायुती सरकारमध्ये सातारा जिल्ह्याला चार कॅबिनेट मंत्रीपदे मिळाल्यामुळे मंत्रिमंडळात साताऱ्याचा दबदबा पाहायला मिळाला. आता पुन्हा पालकमंत्रीपद आपल्याकडे यावं यासाठी शंभूराज देसाई वरिष्ठांकडे फिल्डिंग लावत असल्याचं बोललं जात आहे. तर अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे) मकरंद पाटील यांचं नावही पालकमंत्रिदासाठी चर्चेत आहे. तर भाजपकडून मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नावाला पसंती दिली जातेय. राजघराणे असल्यामुळे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून
विरोध होणार नसल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे पालकमंत्री कोण होणार, यावर अनेक तर्क लावले जाते.

follow us