Download App

खोटं बोलण्याचा उद्धव ठाकरेंचा स्वभाव, आणखी बरेच आमदार.. मुनगंटीवारांनी केला मोठा खुलासा

Sudhir Mungantiwar Criticized Uddhav Thackeray : राज्यात सध्या महाविकास आघाडी आणि भाजपात जोरदार राजकीय कलगीतुरा रंगला आहे. नेत्यांचे शाब्दिक युद्ध जोरदार सुरू आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर देताना त्यांनी उद्धव ठाकरेंवरही टीका केली.

राज्यात सापनाथ नागनाथ एकत्र आले तरी नरेंद्र मोदींचा (PM Narendra Modi) पराभव करू शकणार नाहीत असे वक्तव्य फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले होते. त्यावर उत्तर देत संजय राऊत यांनी नागनाथ सापनाथ यांची येथे पूजा केली जाते. तुम्ही हिंदू आहात ना, असा सवाल केला होता. त्यांच्या याच वक्तव्यावर मुनगंटीवार यांनी हल्ला चढवला.

Nana Patole : एकनाथ शिंदे गारुडी तर देवेंद्र फडणवीस फेकण्यात एक्सपर्ट…

उद्धव ठाकरेंना पक्षाचे आमदारही टिकवता येत नाहीत. यांनी खरेतर राजकारणात राहून करायचे काय? ना जनतेचा विश्वास संपादन करता येत, ना जनतेचा विकास करता येत. 40 आमदार जर फुटतात तर काहीतरी दोष असेल ना. तुमचा काहीच दोष नाही का विचारांचा दोष नक्कीच नाही. दोष तुमच्या कृतीचा आहे. आचरणाचा आहे. आणखी सांगतो, की यांचे बरेच आमदार बाहेर पडतील कारण यांच्या स्वभावामुळे कुणीच टिकू शकत नाही, असा घणाघात मुनगंटीवार यांनी केला.

ते पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे दोन वर्ष आठ महिने मुख्यमंत्री होते. त्यांनी या राज्याची काय अवस्था केली. आर्थिक स्थिती वाईट झाली आहे. लोकांशी खोटे बोलायचे, शेतकऱ्यांशी खोटे बोलायचे. हा यांचा स्वभाव आहे, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली.

‘हे’ संकट दिल्लीपुरतं मर्यादित नाही; केजरीवालांच्या भेटीनंतर पवारांचा केंद्रावर हल्लाबोल

Tags

follow us