Download App

Maharashtra Politics : विधानसभा अध्यक्षांविरोधात ठाकरे-पवार एकत्र; आज होणार ‘सुप्रीम’ सुनावणी

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षात दोन गट (Maharashtra Politics) पडले आहेत. दोन्ही पक्षांतील एक-एक गट सत्तेत सहभागी आहे. सत्तेतील दोन गट आणि विरोधातील दोन गटांकडून मूळ पक्ष आमचाच असल्याचा दावा केला जात असल्याने हा वाद आता कोर्टात पोहोचला आहे. तर दुसरीकडे आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दाही प्रलंबित आहे. आज या मुद्द्यावर शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्या विरोधात या दोन्ही याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

तुम्ही आरोपी म्हणून आत गेलात व जामीनावर बाहेर आलात; तटकरेंनी राऊतांना फटकारले !

आमदार अपात्रतेच्या प्रकरणात राहुल नार्वेकर यांना निर्णय घ्यायचा आहे. मात्र त्यांच्याकडून वेळकाढूपणा केला जात असल्याची तक्रार दोन्ही गटांकडून करण्यात आली आहेत. या प्रकरणात आता कोर्टानेच निर्देश द्यावेत यासाठी याचिका दाखल केल्या आहेत. ठाकरे गटाकडून सुनील प्रभू तर शरद पवार गटाकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे. या दोन्ही याचिकांवरील सुनावणी एकाच दिवशी ठेवण्यात  आली आहे.

ठाकरे गटाकडून दाखल केलेल्या याचिकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना अपात्र करावे अशी मागणी केली गेली आहे. तर शरद पवार गटाच्या याचिकेत अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांवर कारवाई करावा यासाठी न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना सूचना द्याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. दोन्ही गटांकडून दाखल झालेल्या या याचिकांमुळे विधानसभा अध्यक्षांवरील दबाव वाढला आहे. दोन्ही प्रकरणे जवळपास सारखीच असल्याने कोर्ट काहीतरी निर्देश देण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.

पवार आजारी असतांना तो साधा भेटायलाही आला नाही, ही राऊतांची खंत; तटकरेंचा गौप्यस्फोट

दरम्यान, काल या प्रकरणात विधानसभा अध्यक्षांसमोर तिसरी सुनावणी झाली. यावेळी सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घेण्याची मागणी ठाकरे गटाने केली. या सुनावणीला उद्धव ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, आमदार अजय चौधरी आणि शिवसेना ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत विधानभवनात उपस्थित होते. ठाकरे आणि शिंदे गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. आता या प्रकरणात पुढील सुनावणी 20 तारखेला होणार आहे, अशी माहिती शिंदे गटाच्या वकिलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

Tags

follow us