Download App

Maharashtra : मलिन होणारी प्रतिमा सुधारा; दिल्ली दौऱ्यात शाहांनी शिंदे-फडणवीसांना झापलं

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवारांचा गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये दाखल झाल्यानंतर तिन्ही गटातील धुसफूस (Maharashtra Politics) वाढल्याचे दिसत आहे. अजितदादांची एन्ट्री, त्यांच्या आमदारांना वजनदार खाती, त्यानंतर सीएम शिंदे (Eknath Shinde) आणि अजितदादा यांच्यातील कोल्डवॉरच्या आलेल्या बातम्या. पुढे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद असो किंवा थेट मंत्रालयात बैठका घेणे असो, मंत्र्यांच्या अधिकारात हस्तक्षेप असो अशा काही कारणांमुळे अजित पवार (Ajit Pawar) गटाचे भाजपबरोपबरही खटके उडू लागले.

त्यानंतर आता कालच झालेली कॅबिनेट बैठक आणि पुढे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा दिल्ली दौरा या दोन्ही वेळी अजित पवारांचे गैरहजर राहणे यामुळे अजितदादा नाराज असल्याचा मेसेज गेला. सरकारमधील तिन्ही गटात वाद होत असल्याच्याही चर्चा सुरू झाल्या. अखेर आता या चर्चा खऱ्या असल्याचेच समोर येत आहे.

गिधड धमक्या, ठाकरेंना इशारा! नार्वेकरांनी सांगितलं अपात्र आमदारांच्या निकालाचं प्लॅनिंग

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीतील नेतृत्वाने कानपिचक्या दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजपातील वादामुळे राज्य सरकारची प्रतिमा खराब होत आहे ती सुधारा अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केल्याची माहिती आहे. तसेच पालकमंत्रीपदाची नियुक्ती आणि मंत्रिमंडळाचा विस्तार यांवर लवकर निर्णय घ्या, अशीही सूचना अमित शाह यांनी शिंदे फडणवीसांनी केल्याची माहिती आहे.

तिन्ही मंत्र्यांत तब्बल साडेतीन तास बैठक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यात राजधानी दिल्लीत तब्बल साडेतीन तास बैठक झाली. राज्यातील राजकीय घडामोडी आणि अजित पवार यांची नाराजी या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली. तसेच मंत्रिमंडळ विस्तार, आरक्षण, आमदार अपात्रता प्रकरण या मुद्द्यांवरही बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, आता गृहमंत्री अमित शाह यांनीच तिन्ही गटातील वाद कमी करून जनमानसात राज्य सरकारची मलिन होत असलेली राज्य सरकारची प्रतिमा सुधारण्याच्या सूचना दोन्ही नेत्यांना दिल्या आहेत. त्यामुळे आता आगामी काळात शिंदे-फडणवीस धुसफूस थांबविण्यासाठी काय रणनीती आखतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Nanded Hospital Deaths : ‘दवाखान्याची परिस्थिती वाईटच’; मुश्रीफांनीच मान्य केलं ‘सरकारी आरोग्या’चं वास्तव

तिघांच्या बैठकीत ‘या’ मुद्द्यांवर चर्चा

. राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत तिघांत सविस्तर चर्चा

. पालकमंत्री नेमणुकीबाबतही चर्चा

. अजित पवार यांची नाराजी

. निधी वाटप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी झुकतं माप

. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण

. मरठा, धनगर आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा

 

Tags

follow us