Nanded Hospital Deaths : ‘दवाखान्याची परिस्थिती वाईटच’; मुश्रीफांनीच मान्य केलं ‘सरकारी आरोग्या’चं वास्तव

Nanded Hospital Deaths : ‘दवाखान्याची परिस्थिती वाईटच’; मुश्रीफांनीच मान्य केलं ‘सरकारी आरोग्या’चं वास्तव

Nanded Hospital Deaths : नांदेड येथील शासकीय रुग्णालयातील 31 जणांचा मृत्यू (Nanded Hospital Deaths) झाल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली. या घटनेनंतर विरोधकांनी राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. टीकेची झोड उठवली. खूनी सरकार म्हणत सरकावर थेट हल्ला केला. त्यानंतर सरकारनेही या प्रकाराची चौकशी लावली आहे. तर वैद्यकिय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी थेट नांदेड गाठले. येथे आल्यानंतर त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत रुग्णालयातील परिस्थिती वाईट असल्याची कबुलीच देऊन टाकली. खुद्द सरकारमधील मंत्र्यांनेच सरकारी दवाखान्याती कारभाराचा पंचनामा केला आहे.

मृत्यूचं तांडव! बच्चू कडूंनी सरकारला घेरलं; म्हणाले, 75 वर्षांनंतरही..,

नांदेड येथे मंत्री मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यमांशी (Nanded Hospital Deaths) संवाद साधला. यावेळी त्यांनी रुग्णालयाती सद्य परिस्थितीची माहिती दिली. ते म्हणाले, शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात परिस्थिती खरोखरच वाईट आहे. हे पाचशे खाटांचे रुग्णालय आहे पण येथे रोज 800 ते 1000 रुग्ण येतात आणि चारशे ते पाचशे रुग्ण खाली झोपतात. सध्या अशी परिस्थिती आहे की येथे नॅशन मेडिकल कमिशनच्या निकषांनुसार आठ लहान मुलांच्या पेट्या आहेत. त्यात जास्तीत जास्त 16 मुलं ठेवता येतील. पण, काल येथे 68 मुलं होती. एका पेटीत 4-4 मुले ठेवली होती.

रुग्णालयातील मुलभूत सोयी सुविधांवरही मुश्रीफ यांनी भाष्य केले. रुग्णालयात स्वच्छता नाही. दु्र्गंधी येत आहे. स्वच्छता करण्यासाठी टेंडर प्रसिद्ध करण्यात आले परंतु, येथे संघटनांची भांडणं आहेत. या परिस्थितीत बदल करण्यासाठी आता कठोर निर्णय घ्यावेच लागतील, असा इशाराही मुश्रीफ यांनी यावेळी दिला. दवाखान्यात औषधांची कमतरता असल्याचा मुद्दा विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. मात्र, अशी कोणतीही परिस्थिती नाही असे स्पष्टीकरण मुश्रीफ यांनी दिले.

औषधांची टंचाई नाही

जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून (Nanded Hospital Deaths) दहा ते बारा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आल आहे. तसेच तीस टक्के निधी खर्च करण्याची परवानगी दिली आहे.  त्यानंतर आणखी दहा टक्के खर्चाची परवानगी दिली होती. त्यामुळे 40 टक्के औषधे आणि उपकरणांच्या खरेदीसाठी हाफकिनच्या परवानीची गरज नाही, असे मुश्रीफ म्हणाले.

नांदेडच्या सरकारी रुग्णालयाला मुश्रीफांची भेट, ‘प्रत्येक रुग्णांच्या मृत्यूची चौकशी होणार’

मृत्यू प्रकरणाची चौकशी करणार

ही घटना धक्कादायक (Nanded Hospital Deaths) असून याची सखोल चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन करणार असल्याची माहिती मुश्रीफ यांनी याआधीच दिली होती. त्यामुळे सरकारने या घटनेची चौकशी करण्याच्या दिशेने हालचाली सुरू केल्या आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube