Download App

‘आता मुख्यमंत्र्यांनीच गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा’; लाठीमाराच्या घटनेवर चव्हाणांचा संताप

Prithviraj Chavan : मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्जच्या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले आहेत. विरोधी पक्षांकडून राज्य सरकारवर टीकेची झोड उठली आहे. यातच आता काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या राजीनाम्याची मागणी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केली आहे.

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरू असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केल्याने महिलांसह अनेक उपोषणकर्ते गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचा आम्ही निषेध करत आहोत. शांततापूर्ण मार्गाने सुरू असलेले आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. आंदोलन दडपण्याचे आदेश मुंबईतून दिले असल्याचे कळते. या निंदनीय घटनेची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा तत्काळ घेतला पाहिजे, अशी मागणी चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केली.

मराठा आरक्षण आंदोलकांवर लाठीचार्ज; इंडियाची बैठक संपताच शरद पवार मैदानात

मराठा आरक्षणाबाबत सरकारने कोणतीच ठोस भूमिका घेतली नाही. फक्त पोकळ घोषणा देण्याचे काम केले. केंद्रात आणि राज्यात भाजपाचेच सरकार आहे मग, भाजप सरकार मराठा समाजाला आरक्षण का देऊ शकत नाही, असा सवाल उपस्थित करत या प्रश्नाचे स्पष्टीकरण सरकारने द्यावे अशी मागणी चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केली.

आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मराठा बांधवांकडून आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू असताना अशावेळी आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी त्यांचे आंदोलन दडपण्याचा क्रूर प्रकार केला जात असल्याचा आरोप चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केला.

Tags

follow us