Download App

‘पवार साहेब चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री’; सुळेंचे वळसे पाटलांना सणसणीत प्रत्युत्तर

Supriya Sule replies Dilip Walse : राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून राज्यात चांगलाच गदारोळ उठला होता. त्यांच्या या वक्तव्यावर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत आंदोलनेही केली होती. त्यानंतर आता खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही भाष्य केले आहे.

सुळे यांनी आज पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर मते व्यक्त केली. तसेच वळसे पाटील यांनाही प्रत्युत्तर दिले. सुळे म्हणाल्या, शरद पवार चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री झाले. राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाल्यापासून पवार साहेबांनी एकदाही विधानसभा निवडणूक लढली नाही. इंडिया आघाडीतले सगळे लोक आजही पवार साहेबांनाच नेता मानतात. आमचे आमदरही त्यांच्याच नेतृत्वात निवडून येतात. अनेक वेळा आमचा पक्ष राज्यात नंबर एक होता.

Udhav Thackery यांच्या स्टेजवर 2024 पर्यंत चार-पाचच लोक दिसतील; बावनकुळेंचा ठाकरेंना टोला

काय म्हणाले होते वळसे पाटील ?

शरद पवार यांना एकदाही स्वबळावर मु्ख्यमंत्री होता आलं नाही. आपल्याकडे शरद पवारांसारखे उत्तुंग नेते असताना फक्त 60 ते 70 आमदार निवडून येतात. देशात शरद पवार यांच्या उंचीचा कोणताच नेता नाही. पण, महाराष्ट्रातील जनतेनं शरद पवार यांन बहुमत दिलं नाही. त्यांना एकदाी स्वबळावर मुख्यमंत्री होता आलं नाही. ममता बॅनर्जी, मायावती यांसारख्या नेत्या स्वबळावर मुख्यमंत्री बनल्या. अनेक राज्यातील प्रादेशिक पक्ष पुढे जात आहेत. आपल्याकडं शरद पवारांसारखे उत्तुंग नेते आहेत. मात्र, आपले फक्त 60 ते 70 आमदार निवडून येतात. नंतर कुणाबरोबर तरी आघाडी करावी लागते, असे वळसे पाटील एका कार्यक्रमात  म्हणाले होते.

भाजपाचा राष्ट्रवादी फोडण्याचा तीन वेळा प्लॅन

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतीही फूट नाही. अजित पवार आमच्याच पक्षाचे नेते आहेत. त्यांच्या उत्तराची आम्ही वाट पाहत आहोत. राष्ट्रवादी फोडण्याचा हा भाजपाचा पहिला प्रयत्न नाही. याआधीही त्यांनी तिनदा पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला होता. दोन वेळेला त्यांना अपयश आलं. तिसऱ्या वेळेला मात्र तगडी रणनीती आखली आणि अजित पवार यांच्यासोपबत सत्तेत सहभागी झाले, असे सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यातील पत्रकार परिषदेत सांगितले.

‘ग्राहकांचेच हित जपायचे असेल तर कांद्याला अनुदान द्या’; कांदाप्रश्नी थोरातांचा मोदी सरकारवर संताप

Tags

follow us