Download App

राष्ट्रवादीचं विरोधाचं प्लॅनिंग, आढळरावही म्हणतात, “मी फरपटत जाणार नाही”; शिरुरचं तिकीट कुणाला?

Lok Sabha Election 2024 : ‘मलाच उमेदवारी द्या अशी माझी जबरदस्ती नाही. मी काही म्हणालो नाही आणि उमेदवारीबाबत काही जाहीरही केलेलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला जर वाटलं की मी चालण्यासारखा उमेदवार आहे आणि त्यांनी तशी चर्चा मुख्यमंत्र्यांशी केली तर काही होऊ शकेल. माझे कार्यकर्ते सांगतात की आपण पाच वर्षे संघर्ष केला. कामेही केली. आपण खासदारकीसाठी तयार राहिलं पाहिजे यात चूक काय? जर संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला तर मी काय फरपटत थोडाच जाणार आहे की मला उमेदवारी द्याच म्हणून. मी बिना खासदारकीचंही पाच वर्ष काम करतोच आहे ना’, अशा शब्दांत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीबाबत भाष्य केलं.

Lok Sabha : ‘जागावाटपावरून महायुतीत गडबड, भविष्यात भयानक परिस्थिती’; काँग्रेस नेत्याचा दावा

आढळराव पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत भाष्य केलं. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आल्यास स्वीकारणार का ? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. ‘हा निर्णय मी घेण्यापेक्षा आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) घेतील. त्यांनी जसं ठरवतील त्या पद्धतीने मी वागेन. माझ्या पक्षप्रमुखांची आणि नेत्यांची जर तयारी असेल तर काहीतरी होईल अन्यथा नाही. त्यांना टाळून मी काहीच निर्णय घेणार नाही.’

तुमच्या उमेदवारीला मोठा विरोध होताना दिसतोय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांकडून विरोध होत आहे असे विचारले असता, आढळराव म्हणाले, ‘या गोष्टीचा त्यांनी विचार करावा. विरोध का केला जातोय याचं कारण मला तरी दिसत नाही. माझंही काही कारण नाही. त्यांचं काही वेगळं कारण असेल तर मला माहिती नाही.’ महायुतीत जर ही जागा शिंदे गटाच्या वाट्याला आला तरी तुम्ही उमेदवार असणार हे निश्चित आहे तरीही महायुतीतल्या घटक पक्षांकडून तु्म्हाला विरोधच होणार आहे त्याकडे कसं पाहता या प्रश्नावर आढळराव म्हणाले,  त्यांच्या विरोधाचं काय कारण आहे हे मला माहिती नाही. जर विरोध असला तर मी माझ्या परीने त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करील.

Sharad Pawar : शरद पवार इतके का रागावलेत? शिंदे गटाच्या आमदारानं दिलं करेक्ट उत्तर

राष्ट्रवादीकडून जर दुसरा उमेदवार दिला गेला तर काय असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. ‘मलाच उमेदवारी द्या अशी माझी जबरदस्ती नाही. मी काही म्हणालो नाही आणि उमेदवारीबाबत काही जाहीरही केलेलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला जर वाटलं की मी चालण्यासारखा उमेदवार आहे आणि त्यांनी तशी चर्चा मुख्यमंत्र्यांशी केली तर काही होऊ शकेल, असे आढळराव पाटील यांनी स्पष्ट केले.

follow us