Download App

बिड्या वाटायचं ठरलं तरीही पैसे पुरणार नाही; मंत्री रावसाहेब दानवेंचे अजब वक्तव्य

Raosaheb Danve : खासदारांना मतदारसंघातील विकासकामांसाठी मिळणाऱ्या निधीवरून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी अजब विधान केले आहे. आमदार आणि खासदारांना मिळणाऱ्या निधीतील तफावत त्यांनी सांगितली आहे. जालना येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

दानवे म्हणाले, की माझ्या लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी पाच कोटी रुपये निधी मिळतो आणि मला सहा विधानसभा मतदारसंघासाठी पाच कोटी रुपये निधी मिळतो. या निधीतून बिड्या वाटायचं ठरलं तरीही निधी पुरणार नाही, असे वक्तव्य त्यांनी केले.

वाचा : नाथषष्ठी सोहळ्यात विखे-दानवेंची फुगडी..

जालना (Jalna) शहरातील बडी सडक रस्त्याच्या कामाचे उद्घान मंत्री दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दानवे यांनी ही मिश्कील वक्तव्य केले.

दानवे पुढे म्हणाले, आमदारांना एका मतदारसंघासाठी पाच कोटी रुपये मिळतात. तर मला माझ्या लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांसाठी पाच कोटी रुपये निधी मिळतो. खासदार निधीतून पैसे कमी मिळत असले तरी मी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये आहे. त्यामुळे आमदार आणि खासदार निधीच्या भरवशावर न राहता मी राज्य सरकारकडूनही निधी मिळवू शकतो. विकासकामांसाठी पैसे कमी पडतील असे नाही. तर मी कितीही पैसे आणू शकतो असेही दानवे यावेळी म्हणाले.

Union Budget 2023 : हा तर दगाबाज सरकारचा अर्थ संकल्प!अर्थसंकल्पावर अंबादास दानवेंची टीका

दरम्यान, त्यांनी केलेल्या या वक्तव्यावरून आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. दानवे यांनी एक प्रकारे केंद्र सरकारकडून कमी निधी मिळत असल्याचेच सांगितले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातून आता काय प्रतिक्रिया येतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us