नाथषष्ठी सोहळ्यात विखे-दानवेंची फुगडी…

नाथषष्ठी सोहळ्यात विखे-दानवेंची फुगडी…

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातल्या महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या पैठण इथल्या नाथषष्ठी यात्रेला हजेरी लावत भाजपचे नेते आणि केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे आणि खासदार सुजय विखे पाटील यांनी फुगडी खेळण्याचा आनंद लुटला आहे. यावेळी त्यांनी श्री एकनाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन घेत वारकरी संप्रदायाला नाथषष्ठीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Uorfi Javed : कोई इस औरत को बताओ.., ‘सासू-सूने’चा वाद पुन्हा उफाळणार?

छत्रपती संभाजीनगरमधील पैठणमध्ये होत असलेल्या या यात्रेला महत्वाचं स्थान आहे. या यात्रेला प्रारंभ झाला असून राज्यभरातून वारकरी बंधू दिंडी घेऊन दाखल झाले आहेत.

राज्यातून येणारे वारकरी शहरातील विविध भागांत आपले फड, राहुट्या टाकून तीन दिवस नाथभक्तीत लीन होत असतात.विशेष महत्व असलेल्या या यात्रेला भाजप नेते रावसाहेब दानवे आणि खासदर सुजय विखेंनी भेट देऊन नाथभक्तीत लीन झाल्याचं पाहायला मिळाले आहेत.

Budget Session : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरुन अजित पवार विधानसभेत आक्रमक

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत, शेवगाव, राहुरी, श्रीगोंदा भागातून मोठ्या प्रमाणात भाविक या यात्रेला येतात. यावेळी खासदार सुजय विखे यांनी वारकऱ्यांशी संवाद साधला आहे.

दानवे म्हणाले, संत एकनाथांच्या दर्शनासाठी लोकं राज्यातून येतात. सर्व वारकरी बांधवांना नाथषष्ठीच्या शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या आहेत. तसेच संत एकनाथांनी वारकरी संप्रदायाच्या माध्यामातून जे कार्य केलं आहे, ते कार्य आजही समाजात प्रसिध्द असून ही पंढरपूर आणि आळंदीनंतर पैठणची यात्रा प्रसिद्ध असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube