शिवसेनेचे बंडखोर दारात आले तर…? उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या स्टाईलनेच ठणकावलं!

Uddhav Thackeray : अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड घडवून आणत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एन्ट्री घेतली. आपल्यासह काही आमदारांना वजनदार खातीही मिळवून दिली. शरद पवार यांच्याशी वैर घेऊन अजितदादांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा तेव्हा झाली. मात्र, थोड्याच दिवसांत अजित पवार यांच्यासह बंडखोर आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतली. विरोधी पक्षांनीही अजित पवार यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. […]

Uddhav Tackeray

Uddhav Tackeray

Uddhav Thackeray : अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड घडवून आणत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एन्ट्री घेतली. आपल्यासह काही आमदारांना वजनदार खातीही मिळवून दिली. शरद पवार यांच्याशी वैर घेऊन अजितदादांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा तेव्हा झाली. मात्र, थोड्याच दिवसांत अजित पवार यांच्यासह बंडखोर आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतली. विरोधी पक्षांनीही अजित पवार यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. हाच प्रश्न ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना मुलाखतीत विचारला.

राऊत यांच्या या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनीही बाळासाहेब ठाकरे यांच्या स्टाईलनेच उत्तर दिले. त्यांच्या या उत्तराची चांगलीच चर्चा होत आहे.

‘उद्धव ठाकरेंना ‘अल्झायमर’, न्यूरो सर्जनकडून उपचार घ्या’; वाढदिवशीच बावनकुळेंचा खोचक टोला

जसे फुटीर पवारांच्या दारात गेले.. नंतर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट दिले. पवारांचे फोटो लावून मतं मागताहेत किंवा चर्चा घडवत आहेत. अशा प्रकारे शिवसेनेतील फुटीर जर तुमच्या दारात आल तर असा सवाल राऊतांनी विचारला. त्यावर ठाकरे म्हणाले, ‘त्यांची हिंमत नाही येण्याची. आले तर वगैरेचा विषयच नाही. ते येऊच शकत नाहीत. त्यांची हिंमत नाही. त्यांना माझा स्वभाव माहिती आहे आणि शिवसेनेची विचारधारा म्हणजेच बाळासाहेबांची विचारधारा काय आहे, हे त्यांना माहिती आहे.’

हे सगळं त्यांचं ढोंग होतं

ठाकरे पुढे म्हणाले, मी बाळासाहेबांचे विचार सोडले, हे सोडलं ते सोडलं असे त्यांचे म्हणणे आहे. हे सगळं ढोंग होतं. ते, म्हणतात राष्ट्रवादीला कंटाळून आम्ही बाहेर पडलो. पण, आता अजित पवार यांच्याच हातात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या दिल्या गेल्या आहेत. याआधी 2014 ते 2019 मध्ये जेव्हा सत्ता होती तेव्हा तुम्ही आता ज्यांच्याविषयी बोलत आहात याच महाशयांनी भाजपबरोबर कसं बसायचं म्हणून मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळचे तथाकथित मंत्री होते जे आता गेले आहेत. ते बडेजाव मारत होते की आम्ही राजीनामा खिशात घेऊन फिरतो. तुम्हाला कुणी सांगितलं होतं राजीनामा खिशात घेऊन फिरायला, अशी वेळ का आली होती तुमच्यावर असे प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारले.

Exit mobile version