Sushma Andhare : शिवसेना नेते रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम (Sadanand Kadam) यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. या प्रकरणी आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी खळबळजनक दावा केला आहे. सदानंद कदम यांच्यावरील ईडीच्या कारवाईमागे एक लाख एक टक्के रामदास कदम (Ramdas Kadam) यांचा हात असण्याची शक्यता आहे, असा आरोप अंधारे यांनी केला.
वाचा : ईडीला कोर्टात खेचणार, जेलभरो आंदोलन करणार; छापेमारीच्या टायमिंगवर अंधारे भडकल्या
सदानंद कदम सध्या ईडी कोठडीत आहेत. त्यांना दोन दिवसांपूर्वी ईडीने अटक केली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची खेड (जि. रत्नागिरी) येथे सभा झाल्यानंतर ते सदानंद कदम यांच्या घरी गेले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. अंधारे यांनी या टायमिंगवरही निशाणा साधला. त्या म्हणाल्या, की ठाकरे जर उद्या रविंद्र वायकरांच्या घरी गेले तर मग वायकरांवर धाडी टाकणार का, म्हणजे जो कुणी ठाकरेंच्या बाजूने उभा राहिल त्याला आम्ही संपवून टाकू असा त्यामागे अर्थ निघतो का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सुषमा अंधारेंनी केली सोमय्यांची पोलखोल; सोमय्यांनी त्रास दिलेल्या नेत्यांची यादीच वाचली
रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. मला राजकारणाचा गंध नाही मला राजकारण कळत नाही असे आमदार योगेश कदम म्हणत असतील तर त्यांचे म्हणणे बरोबर आहे. मला राजकारणाचा गंध नाही. कारण, त्यांच्या वडिलांनी 50 खोक्यांसाठी शिवसेनेशी गद्दारी केली. राजकारणाचा गंध नसल्याने मला तसे करता येत नाही, असा टोला अंधारे यांनी लगावला.