Download App

Uddhav Thackeray : रामदास कदमांच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची सभा; तोफ कुणावर धडाडणार ?

Uddhav Thackeray : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात आज त्यांची जाहीर सभा रामदास कदम (Ramdas Kadam) यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या खेडमध्ये होणार आहे. सायंकाळी 5 वाजता ही सभा होणार आहे. या सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

या सभेची जोरदार तयारी ठाकरे गटाने केली आहे. याच सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी आमदार संजय कदम हे पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, माजी मंत्री रामदास कदम यांचे निकटवर्तीय माजी बांधकाम समिती सभापती विश्वास कदम हे सुद्ध पक्ष प्रवेश करणार आहेत.

हे वाचा : Uddhav Thackeray : केंद्रीय निवडणूक आयोग आहे की चुना लावणारा आयोग!

या सभेत उद्धव ठाकरे नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना (Shivsena) नाव आणि पक्षाचे चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर ठाकरे अधिक आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाचे नेते भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका करत आहेत. त्यामुळे राज्यातील राजकारण तापले आहे. या सगळ्या घडामोडींनंतर उद्धव ठाकरे यांची प्रथमच सभा होत आहे. त्यामुळे ते कोणावर टीका करतात, कोणाचा समाचार घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Uddhav Thackeray : मोगॅम्बोच्या कितीही पिढ्या आल्या तरी पुरून उरू

शिंदे गटाची आशिर्वाद यात्रा

आज मुंबईत शिंदे गट आणि भाजपची आशिर्वाद यात्रा निघणार आहे. त्यामुळेही राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. ठाकरे गटाने जे प्लानिंग केले आहे, त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात ही यात्रा निघणार आहेत. या यात्रेत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह भाजप व शिंदे गटातील नेते सहभागी होणार आहेत. ही यात्रा माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातून सुरू होणार आहे.

https://www.youtube.com/watch?v=gV0gOWpzPyo

 

follow us