Mahavikas aaghadi will get 180 seats in the Legislative Assembly : काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुकळे (Chandrasekhar Bavanukale) यांनी भाजप 2024 च्या विधानसभा निवडणुकीत 240 जागा लढण्याच्या तयारीत असून शिवसेनेला फक्त 48 जागा देणार आहे, असं सांगत सांगितलं होतं. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांसाठी सज्जा राहण्याचे आवाहन केलं होतं. बावनकुळे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना उधान आलं होतं. दरम्यान, आता कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी आगामी निवडणुकीसंदर्भात मोठं विधान केलं. आगामी विधानसभा निवडणुकीत (assembly elections) महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळेल, असं थोरात म्हणाले.
कबसा निवडणुकीच्या वेळी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सांगितले दावा केला होता की, आगामी विधानसभा निवडणुकीत विरोधकांनी एकजुटीने आणि एकदिलाने काम केलं तर महाविकास आघाडीला 200 पेक्षा जास्त जागा मिळतील, आणि लोकभसेत 40 तरी जागा जिंकू असा विश्वास केला होता. त्यानंतर बाळासाहेब थोरातांनीही 180 पेक्षा जास्त जागा जिंकू असा विश्वास व्यक्त केला आहे. धुळे जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने एक मेळावा आयोजित केला. त्यावेळी थोरातांनी धुळ्यात माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. थोरात म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 38 जागा मिळतील, तर विधानसभेच्या निवडणुकीत 180 जागा मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शेतकऱ्यांवर अस्मानी संकट! राज्यातील अनेक भागांत निसर्गाने मूड बदलला…
यावेळी राज्याचे मंत्रिमंडळ हे अयोध्या येथे दर्शनासाठी गेल्याचा उपस्थित केला असता त्यांनी सांगितले की, देव दर्शनाला जाणे ही चांगली बाब आहे. मात्र, कुटुंब व्यवस्थित राहिले पाहिजे म्हणजे, देवाला जाण्याचा आनंद असतो. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत आलेला असतांना हा दौरा आयोजित केला आहे. राज्यात एकीकडे अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान होत आहे. त्यामुळं शेतकरी हा हताश आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यासोबतत – आमदारांसोबत अयोध्येचा दौरा करत आहे. मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांशी बळीराजाकडे पाठ फिरवली आहे. राजकारण्यांनी शेतकरऱ्यांची काळजी घेतली तर शेतकरी आणि देव देखील आशिर्वाद देतील, असा टोला त्यांनी लगावला.
ईव्हीएम मशीनवर माझा विश्वास असल्याचे वक्तव्य विरोधी पक्षेनेते अजित पवार यांनी व्यक्त केलं होतं. त्या संदर्भात बोलतांना थोरात म्हणाले की, जेव्हा निवडणुकीचा निकाल समोर येतो, तेव्हा ईव्हीएम मशीनबाबत संशय निर्माण होतो. कुणी काय बोलावं हा ज्याचा त्याचा वैयक्तीक प्रश्न असल्याचं थोरातांनी सांगितलं.