शेतकऱ्यांवर अस्मानी संकट! राज्यातील अनेक भागांत निसर्गाने मूड बदलला…

शेतकऱ्यांवर अस्मानी संकट! राज्यातील अनेक भागांत निसर्गाने मूड बदलला…

राज्यावर अवकाळी पावसाचं संकट कोसळलंय. राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने जोरदार बॅटिंग करत धुमाकूळ घातला आहे. सलग दोन दिवसांपासून मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, खान्देश, पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पाऊस झाला. तर पुढील पाच दिवस राज्यातील काही भागांत अवकाळीचं सावट राहणार असल्याचं हवामान तज्ज्ञांकडून सांगण्यात आलंय.

शिंदे यांचा अयोध्या दौरा गाजला! पण सत्तार आणि बच्चू कडू यांनी का दांडी मारली?

यामध्ये विशेषत: जालना, नांदेड, हिंगोली, धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसलाय. तर बीड आणि कन्नडमध्ये गारपीटीचा तडाखा बसला आहे. या भागांत विजांच्या कडकडाटासह जवळपास एक तासभर पाऊस सुरु होता.

अवकाळी पावसाचा शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणात फटका बसत असून हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. अंगावर वीज पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

अयोध्येतील वातावरण पाहून विरोधकांना झोप येणार नाही; श्रीकांत शिंदेचा हल्लाबोल

राज्यात विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातील काही भागात आगामी पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण राहणार असल्याचे हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले. कांदा, द्राक्ष, गहू, आंबा, फळबागांचं मोठ्या प्रमाणात नूकसान झालं तर वादळी पाऊस असल्याने काही शेतकऱ्यांच्या घरांचे पत्रे उडून गेल्याचंही समोर आलंय.

मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर हल्ला : रावणराज चालवले… म्हणूनच जनतेने त्यांना हटवले!

राज्यातला शेतकरी अर्थिक अडचणीत सापडलेला असताना सत्ताधाऱ्यांची अयोध्यावारी सुरु असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही तत्काळ पंचनामे करुन मदत देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीय.

पुढील पाच दिवस राज्यातल्या विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात अवकाळी पावसाचं सावट असंच राहणार असल्याची शक्यता हवामानतज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube