Mahesh Tapase NCP : फडणवीस की बावनकुळे कोण खरे बोलतंय ते सांगा?

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP )  राज्याचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे ( Mahesh Tapase )  यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule )  व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis )  यांच्यावर टीका केली आहे.  चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांची परस्पर विरोधी वक्तव्ये असून हे दोघेही लोकांच्या मनात राष्ट्रवादीविषयी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (68)

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (68)

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP )  राज्याचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे ( Mahesh Tapase )  यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule )  व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis )  यांच्यावर टीका केली आहे.  चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांची परस्पर विरोधी वक्तव्ये असून हे दोघेही लोकांच्या मनात राष्ट्रवादीविषयी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप महेश तपासे यांनी केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांना भाजपसोबत युती मान्य होती परंतु देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री मान्य नव्हते असे वक्तव्य केले आहे, त्यावर महेश तपासे यांनी जोरदार टीका केली आहे.

बावनकुळे आणि फडणवीस या दोघांची वक्तव्ये परस्परविरोधी आहे. या दोघांमध्ये कोण खरं बोलतंय हा संशोधनाचा विषय आहे. महाराष्ट्रात भाजपला राष्ट्रवादीने जवळ केलेले नाही आणि करणारही नाही, अशी टीका त्यांनी भाजपवर केली आहे. तसेच महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसोबतच राष्ट्रवादी आहे, असेही महेश तपासे यांनी स्पष्ट केले आहे.

(Eknath Shinde : ‘मी दिलेल्या गोष्टी कधी काढत नाही आणि त्यावर बोलणार नाही’, शिंदेंचा ठाकरेंना टोला)

तसेच यावेळी बोलताना तपासे यांनी  काही दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीला शरद पवारांचा आशिर्वाद होता असे वक्तव्य केले आणि म्हणून ते मुख्यमंत्री पुन्हा झाले याची आठवणही महेश तपासे यांनी बावनकुळे यांना करुन दिली आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेचा अजित पवारांसोबतचा शपथविधी हा शरद पवारांशी बोलून झाला होता, असे विधान केले होते. त्यावर शरद पवारांनी आधी नकार दिला होता, पण नंतर बोलताना पहाटेच्या शपथविधीशिवाय राष्ट्रपती राजवट उठली असती का, असा प्रश्न उपस्थित करत गुगली टाकली होती.

Exit mobile version