Eknath Shinde : ‘मी दिलेल्या गोष्टी कधी काढत नाही आणि त्यावर बोलणार नाही’, शिंदेंचा ठाकरेंना टोला

Eknath Shinde : ‘मी दिलेल्या गोष्टी कधी काढत नाही आणि त्यावर बोलणार नाही’, शिंदेंचा ठाकरेंना टोला

औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांनी दाखवलेला धनुष्यबाण बाळासाहेबांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गिफ्ट दिलेला होता. त्याबद्दल विचारले असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘मी दिलेल्या गोष्टी कधी काढत नाही आणि त्यावर बोलणार नाही’ पण निवडणूक आयोगाच्या निर्णयावर त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने ती फेटाळली निवडणूक आयोगाचा निकाल कायम आहे. खरी शिवसेना आमच्याकडेच आहे. असंही ते म्हणाले. ते औरंगाबाद येथे आले असता बोलत होते.

औरंगाबाद शहरातील औरंगाबाद मुंबई हायवे जवळ साजापूर परिसरामध्ये आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या हॉटेलचे उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री औरंगाबाद येथे आले असता त्यांचे औरंगाबाद विमानतळावर कार्यकर्त्यांनी स्वागत केले. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री संदिपान भुमरे व आमदार संजय शिरसाट उपस्थित होते. त्याचबरोबर विद्यार्थी व नागरिकांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले.

Eknath Shinde : …म्हणून उद्धव ठाकरे आणि विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली

‘निवडणूक आयोगाचा निर्णय आमच्या बाजूने आल्याने उद्धव ठाकरे आणि विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आम्ही जे धडाकेबाज निर्णय घेतोय त्यामुळे ते घाबरलेले आहे आणि बिथरलेले आहे त्यामुळे आमच्यावर आरोप करत आहे. पण आम्ही कामाने उत्तर देऊ.’ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

त्याचबरोबर यावेळी त्यांनी, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी लोकसेवा आयोग बोलण्याऐवजी निवडणूक आयोग असा उल्लेख केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाल्यानंतर या विधानावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलंय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर बोलताना मी अनावधानानं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाऐवजी निवडणूक आयोग असा शब्द उच्चारला. दिवसभर कोर्टकचेरी, निवडणूक आयोगाच्या बातम्या सुरू होत्या. त्यामुळं चुकून माझ्या तोंडून निवडणूक आयोग असा शब्द निघालाय, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube